आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • European Atheletics Championship News In Marathi, France, Divya Marathi

युरोपियन अँथलेटिक्स चॅम्पियनशिप : टी शर्ट काढून जल्लोष केल्याने गमावले सुवर्णपदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच - फ्रान्सच्या मेहिदिन मेखिसीला टी शर्ट काढून केलेला सुवर्ण यशाचा जल्लोष फारच महागात पडला. युरोपियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याला एका वेगळ्याच आणि अविस्मरणीय प्रसंगाला सामोरे जावे लागले. या वेळी केलेल्या विजयी जल्लोषामुळेच त्याला सुवर्णपदक गमवावे लागले.

झुरिच येथे सुरू असलेल्या युरोपियन चॅम्पियनशिपच्या 3000 मीटर स्टीपलचेंज प्रकारात क्रॉसिंग लाइन गाठण्याआधीच मेखिसीने आपला विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. या वेळी त्याने अंगावरचा टी शर्टही बाहेर काढून आनंदोत्सवात फडकावण्यास सुरुवात केली. या वेळी त्याला ताकीदही देण्यात आली. त्यामुळे त्याने लगेच टी शर्ट घातला. मात्र, स्पर्धेत चौथ्या स्थानी आलेल्या स्पेनच्या एंजेल मुलेराने याला विरोध दर्शवला. त्यामुळे आयोजकांनी गैरवर्तन प्रकरणी मेखिसीचे सुवर्णपदक परत घेतले.

तसेच या स्पर्धेत दुस-या स्थानी असलेला योहान कोवल सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. चौथ्या स्थानी असलेल्या मुलेराला कांस्यपदकाने गौरवण्यात आले.

आयएएएफचा कडक नियम
आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या नियमानुसार धावपटूंना ट्रॅकवर वैद्यकीय संकेताच्या कारणाशिवाय टी शर्ट काढता येत नाही. त्याशिवाय केलेले वर्तन हे अनधिकृत ठरते.

डॅनियल मेऊस्सीला सुवर्णपदक
पुरुष गटाच्या मॅरेथॉनमध्ये इटलीचा डॅनियल मेऊस्सी सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने 2 मिनिट 11.08 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. त्यापाठोपाठ पोलंडच्या शेगुमोने रौप्यपदकावर नाव कोरले. त्याने 2 मिनिट 12.00 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. तसेच रशियाच्या अलेक्सी रेउन्कोवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला 2 मिनिटे 12.15 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण करता आले.