आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्नांडो टोरेसचा डबल धमाका; चेल्सी 3-1 ने विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - युरोपियन चॅम्पियन चेल्सीने युरोपा फुटबॉल लीगमध्ये शानदार विजय मिळवला. चेल्सीने रशियाच्या रुबिन कझानचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. स्पेनचा सुपरस्टार स्ट्रायकर फर्नांडो टोरेसने केलेल्या दोन गोलच्या बळावर चेल्सीने सामन्यात विजयाची मोहर उमटवली. व्हिक्टर मोसेसने देखील या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. शानदार कामगिरी करणारा टोरेस सामनावीरचा मानकरी ठरला.
सामन्याच्या 17 व्या मिनिटाला चेल्सीने मुसंडी मारली. फर्नांडो टोरेसने हा शानदार गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हिक्टर मोसेसने 32 व्या मिनिटाला संघाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्याने रुबिन कझानच्या गोलरक्षकाला हुलकावणी देऊन वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा गोल नोंदवला. या आघाडीच्या बळावर चेल्सीने मध्यंतरापूर्वीच सामन्यात दबदबा निर्माण केला. दरम्यान, 41 व्या मिनिटाला सामन्यात पहिला गोल करण्यात रशियाच्या फुटबॉल क्लबला यश मिळाले.

न्यू कॅसल युनायटेडचा पराभव
दुसरीकडे लीगमध्ये न्यूकॅसल युनायटेडला पराभवाचा सामना करावा लागला. बेनफिसाने न्यूकॅसलचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. रोड्रीगो (25 मि.), लिमा (66 मि.), कार्डोझो (71 मि.) यांनी संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या 12 व्या मिनिटाला युनायटेडच्या सिस्सेईने पहिला गोल केला होता.