आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Cricketer Farokh Engineer Comment On Veerendra Sehawag

IPL: सेहवागने क्रिकेट सोडून द्यावे- इंजिनिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयपीएल-6 मध्ये सुमार कामगिरी करणाºया दिल्लीचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागला माजी क्रिकेटपटू फारूक इंजिनिअर यांनी क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला आहे. सेहवागने शुक्रवारी बंगळुरूविरुद्ध 18 धावा काढल्या. या खेळीला बघून इंजिनिअर यांनी त्याला क्रिकेटपासून दूर होण्याचा सल्ला दिला. इंजिनिअर म्हणाले, ‘मी सेहवागसारख्या दिग्गज खेळाडूचा नेहमी समर्थक राहिलो आहे. मात्र, त्याच्यासारखा खेळाडू रवी रामपॉलसारख्या मध्यमगती गोलंदाजासमोर संघर्ष करीत असल्याचे बघून मला दु:ख झाले. सेहवाग शॉर्टपिच चेंडूला समजू शकत नसेल तर मला खरोखर वाटते की, त्याने क्रिकेट सोडायला हवे.’