आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EXCLUSIVE: These Are The Only Ones Who Were Selling Scooter Biscuit Bowl Bhujiya

EXCLUSIVE: हरभजनसिंग झाला \'आम आदमी\' .....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- एखाद्या व्‍यक्‍तीबद्दल सांगायचे झाल्‍यास ते आपण काही शब्‍दांत व्‍यक्‍त करू शकतो. परंतु, समाजामध्‍ये काही व्‍यक्‍ती अशा असतात, त्‍यांचे वर्णय शब्‍दांत करायचे म्‍हटले, की मर्यादा पडतात. त्‍यापैकीच एक असणारा भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज हरभजनसिंग.

क्रिकेटच्‍या विश्वातील या व्‍यक्‍तीच्‍या जगण्‍यातील काही महत्त्वाच्‍या बाबी आपल्‍याला पाहायला मिळणार आहेत. 'मिशन सपने' या कार्यक्रमात. हा कार्यक्रम एप्रिलमध्‍ये कलर्स या वाहिनीवर सुरू होणार आहे. यामध्‍ये हरभजनसिंग याच्‍या जीवनाशी संबंधीत काही महत्त्वाच्‍या बाबी आपल्‍याला पाहायला मिळणार आहेत. याचे शुटींग चंदीगड येथील वीरवार या ठिकाणी करण्‍यात आले. यावेळी सेक्‍टर - 17, प्‍लाझा या ठिकाणी हरभजन याचा वेगळा लुक सर्वांना पाहायला मिळाला. यावेळी हरभजन 'बिस्किटवाला' होऊन बिस्किट विकत होता.

कलर्सच्‍या या कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून सर्वसाधारण व्‍यक्‍तीप्रमाणे बिस्किटवाला 'राम अवतार' याचा अभिनय हरभजन करत होता. ही भूमिका हरभजनसिंगला करायची काय गरज आहे... हा प्रश्‍न तुम्‍हाल नक्‍कीच पडला असेल, 'राम आवतार' मध्‍ये पत्‍नी मंजु हिला झालेला कर्करोग, या आजारावर उपचार करण्‍यासाठी हरभजनसिंग हे काम करत आहे. आपल्‍या नावाला असलेले वलय आणि समाजात निर्माण झालेली प्रतिमा प्रत्‍येक व्‍यक्‍ती जपत असते. हरभजनसिंगच्‍या नावाला वलय जरी असले तरी त्‍याने या शोमध्‍ये आम आदमीची भूमिका केली आहे.

यावेळी हरभजसिंग म्‍हणाला की, मला माझे स्‍पप्‍न पूर्ण करण्‍यासाठी संघर्ष करावा लागला. त्‍यावेळी सरावासाठी वेळच मिळत नव्‍हता. आता दुस-यासाठी काही करायला वेळ मिळत आहे. म्‍हणून मी सर्वसाधारण व्यक्तीसारखे आयुष्‍य जगतो, सोबतच बिस्‍केट व खारेमुरेही विकले.

'मिशन सपने' हा शो एप्रिलपासून कलर्सवर दाखवण्‍यात येणार आहे. या शोमध्‍ये हरभजनसिंगसोबत सलमान खान, वरूण धवन, मीकासिंग यांच्‍यासोबत इतरही बॉलीवुडच्‍या कलाकारांचा समावेश या शोमध्‍ये असणार आहे.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पाहा हरभजनसिंगचे EXCLUSIVE: छायाचित्रे......