आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार धोनीला विनाकारण ‘ओरड’ करायची काय गरज होती ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडविरुद्ध साऊदम्पटन कसोटीतील लाजिरवाण्या पराभवाला निश्चितपणे कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबाबदार आहे. 266 धावांनी झालेल्या या पराभवात त्याची रणनीती पूर्णपणे फ्लॉप ठरली. जेम्स अँडरसनविरुद्ध भारताने लेव्हल 3 चे लावलेले आरोपही निराधार ठरले. हेसुद्धा लाजिरवाणे आहे. त्यांनी आपल्याला हरवले आणि संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले. आता कोणता मार्ग राहिला आहे. मी इतका सल्ला देईन की, धोनीने सर्व घटनांतून बाहेर यावे आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी. आयसीसीचे न्यायाधीश आणि आयुक्त जॉर्डन लुइस यांनी आपल निर्णयात अँडरसन आणि रवींद्र जडेजा या दोघांना दोषी ठरवले नाही. मात्र, या दोघांच्या या घटनेने खूप वाद निर्माण केला. हा वाद खास नव्हता. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी जडेजावर खूप लवकर निकाल लावला, हेही आपण पाहिले. त्यांनी जडेजाला लेव्हल 1 मध्ये दोषी ठरवताना दंडित केले. यानंतर सर्वांना वाटत होते की, यजमान संघाचा गोलंदाज अँडरसनवर किमान दोन सामन्यांची बंदी लागेल. मात्र, लुइस यांनी त्याला निर्दोष ठरवले. लुइस यांच्या निर्णयाने सर्व जण फक्त चकितच झाले नाही, तर भूकंपच आला. माझ्या मते, याप्रकरणी भारतीय संघ व्यवस्थापनाकडून मांडण्यात आलेले तर्कसुद्धा दमदार नव्हते. मात्र, इंग्लंडने खूप योग्य पद्धतीने आपले तर्क सादर करताना आपल्या खेळाडूला दोन सामन्यांच्या बंदीपासून वाचवले. माझ्या मते, धोनीने खूप चुका केल्या. सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सामन्यावर बोलण्याऐवजी तो जडेजा-अँडरसन वादावर खूप बोलला. याची गरज नव्हती. खेळावर त्याचे लक्ष गरजेचे होते. दुसरी चूक म्हणजे त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये अतिरिक्त फलंदाज (रोहित शर्मा) खेळवण्याची गरज नव्हती. अँडरसन-जडेजा वादप्रकरणी तक्रार झाल्यानंतर धोनीला विनाकारण ‘ओरड’ करायची गरजच काय होती? निर्णय येईपर्यंत त्याने थांबून पूर्ण लक्ष खेळावर केंद्रित करायला हवे होते. कर्णधार म्हणून आपल्या खेळाडूचे समर्थन करणे हे धोनीचे काम आहे, हे समजू शकते. मात्र, धोनीवर संपूर्ण संघाची जबाबदारी असल्याने त्याने स्वत:ला या वादात ओढण्याची गरज नव्हती, असे मला वाटते. धोनीने विनाकारण फोकस भटकू दिले. मालिकेत 1-0 ने पुढे असताना धोनीने पाच गोलंदाजांना खेळवण्याऐवजी अतिरिक्त फलंदाजाला का महत्त्व दिले, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. रक्षात्मक होण्याची गरज नव्हती. पहिल्या दोन कसोटींत पाच गोलंदाजांची रणनीती योग्य ठरली. मग ही रणनीती का बदलली? आता इंग्लंड चौथ्या कसोटीत विजयाच्या इराद्यानेच खेळेल. तिसºया कसोटीत भारताने सुमार फलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीही सुमार दर्जाची केली. आता तर ईशांत आणि भुवनेश्वर जखमी आहेत. इंग्लंड मालिकेत आघाडी घेईल की नाही, हे बघावे लागेल.