आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विन टीम इंडियाचा सर्वात माेठा मॅचविनर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंडविरुद्ध शानदार कामगिरीनंतरही काही टीकाकार हे अार. अश्विनच्या याेग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत अाहेत. त्यांच्या मते, घरच्या मैदानावर सरस कामगिरी करणारा अश्विन विदेशी खेळपट्टीवर प्रभावशाली कामगिरी करत अाहे. माझ्या मते हा विचार अवमानास्पद अाहे. खेळपट्टी सर्वच गाेलंदाजांसाठी एकसारखी हाेती अाणि अशात अश्विनने केलेली कामगिरी ही (३ कसाेटी, २७ विकेट) खऱ्या अर्थाने काैतुकास्पद ठरली अाहे. कारण याच खेळपट्टीवर इतर गाेलंदाजांना हे यश संपादन करता अाले नाही.
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपूर्वी गत ११ कसाेटींत अश्विनने ६९ विकेट घेतल्या हाेत्या. यात श्रीलंकेविरुद्ध तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २१, दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध चार कसाेटींत ३१ अाणि विंडीजविरुद्ध चार कसाेटींच्या मालिकेत १७ गडी बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसाेटींसह त्याने गत १४ कसाेटींत एकूण ९७ विकेट घेतल्या अाहेत. म्हणजेच एका कसाेटीत सात गडी बाद करण्याची त्याने किमया साधली. यातील दाेन मालिका (श्रीलंका, विंडीजविरुद्ध) विदेशात झाल्या हाेत्या. श्रीलंका संघ सध्या कामगिरीचा दर्जा उंचावत अाहे. याच प्रक्रियेतून हा संघ जात अाहे. तसेच विंडीजच्या टीममध्ये पहिल्यासारखी सरस कामगिरीची क्षमता राहिली नाही. मात्र, तुम्ही अशाच प्रतिस्पर्धीविरुद्ध गाेलंदाजी करता, ज्यासाठी तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. एकूणच पदार्पणापासून अाजतागायत पाच वर्षांत अश्विनने ३९ कसाेटींत २२० गडी बाद केले अाहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा चार्ली ग्रिमेटनंतर चांगला अाहे. अशा काैतुकास्पद कामगिरीकडे काेणीही दुर्लक्ष करू शकत नाही. भारताच्या इतर फिरकीपटूंमध्ये केवळ सुभाष गुप्तेचा विदेशातील स्ट्राइक रेट हा भारतातील सरासरीच्या जवळपास बराेबरीत अाहे. इतर फिरकीपटूंनी भारतात चांगली कामगिरी केली अाहे.
घरच्या मैदानावर अश्विन अाणि इतर भारतीय स्पिनरवर केली जाणारी टीका ही तर्काच्या अाधारे केली जाते. कारण भारतीय खेळपट्ट्या या भारतीय फिरकीपटूंसाठी मदतगार असतात. यातून क्रिकेटला चालना मिळत नाही. हा तर्क संशयास्पद अाहे. दाेन देशांतील संघाच्या खेळपट्टीमध्ये अाणि हवामानामध्ये माेठे अंतर असते. सर्वच खेळपट्ट्यांना एकसारखे तयार केले जाऊ शकत नाही. यासाठी काेणताही प्रयत्न केला जाऊ नये. अश्विनला अाता विदेशातील अागामी मालिकांमध्ये सरस कामगिरी करण्याची गरज अाहे. मात्र, हे सर्व काही वेळ अाणि अनुभवातून जुळून येत असते. महत्त्वाकांक्षीपणा हेच अश्विनच्या कामगिरीचे खास वैशिष्ट्य अाहे. याच वैशिष्ट्याला टॅलेंटची जाेड मिळाल्यावर सरस कामगिरी केली जाते. याच वैशिष्ट्यामुळे अश्विन हा भारतासाठी सर्वात अव्वल मॅचविनर ठरू शकताे.
बातम्या आणखी आहेत...