आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या क्रिकेट बॉससाठी राजकारण तापले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट प्रशासनातील त्रिमूर्ती एन. श्रीनिवासन, शरद पवार आणि अरुण जेटली सध्या चर्चेत आहेत. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर पुढचा अध्यक्ष ठरवायचा आहे. मात्र, या तिघांचे एकमत झालेले नाही. राजकीय वातावरण गरम झाले आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी, असे अरुण जेटली यांना वाटते, तर निवडणुकीच्या विरोधात पवार-श्रीनि गट आहे.

दालमिया यांच्या निधनानंतर मागच्या आठवड्यात दोन पदे एकत्र ओपन झाली. एक बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद आणि दुसरे बीसीसीआयचे अध्यक्षपद. सौरव गांगुलीला अध्यक्ष बनवून पहिले पद भरण्यात आले. मात्र, दुसऱ्या पदासाठी रहस्य अजून कायम आहे.
बीसीसीआयमध्ये कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि एन. श्रीनिवासन सध्या एकत्र दिसत आहेत. २०१० मध्ये आयपीएलचे तत्कालीन चेअरमन ललित मोदी यांची हकालपट्टी आणि दोन नव्या फ्रँचायझी टीमच्या विक्रीमुळे दोघे नेहमी समोरासमोर होते. मात्र, मागच्या आठवड्यात या दोघांत पॅचअप होत असल्याचे दिसून आले. क्रिकेटला बदनामीपासून रोखण्यासाठी आम्ही सोबत आलो, असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे म्हणणे चुकीचे आहे. खरे तर श्रीनिवासन यांना आपल्या अायसीसीच्या अध्यक्षपदाची िचंता अधिक आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष त्यांच्या गटाचा नाही झाला तर अायसीसी अध्यक्षपदावरून त्यांची सुटी होऊ शकते, हे त्यांना माहिती आहे. श्रीनिवासन यांना आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायमूर्ती मुदगल आणि लोढा समितीचा निर्णय ऐकावा लागला आणि त्यांच्या हातून बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची खुर्ची गेली. आता स्वत:चे अस्तित्व वाचवण्यासाठी ते आपली पूर्ण शक्ती लावत आहेत. अखेर बीसीसीआयचा नवा बॉस कोण होईल?.. अनुराग ठाकूर, शशांक मनोहर, अमिताभ चौधरी, राजीव शुक्ला आणि अनिरुद्ध चौधरी की आणखी कोणी?.. याचे उत्तर निश्चितपणे शरद पवार, श्रनिवासन आणि अरुण जेटली यांच्याकडे आहे. याचा अर्थ असा की क्रिकेटचा बॉस कोण हे ठरवण्यासाठी राजकीय पक्षांची मदत गरजेची आहे. जेटली भाजप, पवार एनसीपी आणि राजीव शुक्ला काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. आता सौरव गांगुलीमुळे यात चौथा राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेसही सामील झाला आहे. नव्या बॉससाठी राजकीय चादर पसरली आहे. पूर्व विभागातून कोणी अध्यक्ष झाला तर त्याचा कार्यकाळ २०१७ पर्यंत असेल. पूर्व विभागाचा दावा येतो की नाही, हे ममता बॅनर्जी आणि सौरव गांगुली यांच्यावर अवलंबून असेल. सौरव अचानक किंगमेकर होत असल्याचे दिसत आहे. पूर्व विभागाचा अध्यक्ष व्हावा, यासाठी सौरवने अाग्रह केला नाही तर दुसऱ्या विभागातून नाव पुढे येईल आणि त्यावर एकमत होणे कठीण असेल. नव्या नावाला अरुण जेटलींचा गट बहुधा स्वीकारणार नाही. त्या वेळी बहुधा निवडणुकीची वेळ येईल. ही शक्यता नाकारता येत नाही.