आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाला धडा शिकवणारा हा पराभव : गावसकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंिडयाचा श्रीलंकेकडून झालेला पराभव भारतीय िक्रकेटपटूंना धडा शिकवणारा अाहे, असे मत माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.

या पराभवापासून भारतीय िक्रकेटपटंूना बरेच काही शिकण्यासारखे आहे. लंकेच्या ितन्ही वेगवान गोलंदाजांनी ज्या प्रकारे वैविध्यपूर्ण मारा केला त्याचा सामना कशा प्रकारे धीराने व सावधपणे करायला हवा, याची जाण टीम इंिडयाला व्हायला हवी, असेही गावसकर म्हणाले.
फलंदाजीस आल्यावर भारताने फारच वाईट सुरुवात केली. पहिल्याच षटकात दोन फलंदाज गमावल्यामुळे सर्व संघ १०१ धावांत गारद झाला. षटकार खेचण्याच्या नादात शिखर धवन बाद झाल्यानंतर त्याच षटकात सुरेश रैनाने एक चौकार व षटकार खेचला. त्यामुळे त्या षटकाच्या धावा खात्यात जमा झाल्या होत्या. त्यानंतरही आततायीपणा केल्यामुळे संघाला नुकसान सहन करावे लागले. बरे, या तिन्ही नव्या गोलंदाजांचा याआधी भारतीय फलंदाजांनी सामना केला नव्हता. तरी ते गाफीलपणे खेळले. जरी तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितले असतील तरी प्रत्यक्षपणे मैदानात खेळणे हे त्याहून वेगळे असते, याची जाण ठेवली असती तर नामुष्कीजनक पराभव पदरी आला नसता, असे मतही माजी फलंदाजाने व्यक्त केले.

चुकांचे अनुकरण
लंकेचे गोलंदाज अचूक िदशा व टप्प्यावर मारा करत होते. त्याचप्रमाणे त्यांचा चेंडू दोन्हीकडे वळत होता. त्यामुळे अशा गोलंदाजांना आधी समजून त्यांचा सावधपणे सामना करणे शहाणपणाचे आहे. प्रथम दोन फलंदाज गमावल्यानंतर तरी इतरांना यापासून धडा िमळायला हवा होता. यापुढे असे व्हायला नको, असा सल्लाही गावसकरांनी िदला आहे.