आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली-महिलांच्या स्वसंरक्षणासाठी तंत्रशुद्ध कराटे फायदेशीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्या देशात महिलांच्या छेडखानीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिला संरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला आहे. यासाठी इतरांवर अवलंबुन न राहता स्वत:च स्वत:च्या रक्षणासाठी सज्ज राहणे महत्वाचे ठरत आहे. म्हणूनच मुली-महिलाच्या स्वसंरक्षणासाठी तसेच लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी कराटे खेळ फायदेशीर आहे, अशी माहिती जिल्हा कराटे संघटनेचे सचिव सुरेश मिरकर यांनी दिली.
पाच वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले/मुली कराटेच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊ शकतात. कराटेमुळे संपूर्ण शरीराची हालचाल होऊन शरीराला बळकटी येते. यात नियमितपणे 45 मिनिटे व्यायाम करून घेतल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढते, मन प्रसन्न आणि शरीर सुदृढ राहते. त्यामुळे मुले निरोगी राहतात. त्याचप्रमाणे शाळा-महाविद्यालयातील खेळाडूंना क्रीडा गुणांचा फायदा होतो. या खेळात आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवले आहे.
जिल्ह्यात कराटे संघटनेतर्फे प्रशिक्षणवर्ग चालवला जातो. या प्रशिक्षणवर्गात सहभागी मुलांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, एकाग्रता, व्यायामाचे धडे दिले जातील. विशेष म्हणजे येथे मुली व महिलांसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षक उपलब्ध आहेत. इच्छूक खेळाडूंना प्रशिक्षणस्थळी मुख्य प्रशिक्षक सुरेश मिरकर यांच्याशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करता येईल.
प्रशिक्षक व ठिकाण
जिल्हा कराटे संघटनेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक सुरेश मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय सरदार, संकेत जाधव, सुमीत खरात, महिला प्रशिक्षक जान्हवी सोनाटकर, निशिगंधा सक्सेना हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. प्रशिक्षण मनपा शाळा, एन-9 आणि गरवारे कम्युनिटी सेंटर येथे सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 6 वाजेदरम्यान दोन सत्रात चालते.