आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • F1 Driver Jules Bianchi Injured After Crash In Japan, News In Marathi

जपान ग्रांप्री स्‍पर्धा जीवावर बेतली, रेसर ज्युलिस बिनाची शुध्‍द हरपली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजुका – जपानच्‍या एफ-1 ग्रांपीमध्‍ये एक दुर्घटना घडली. रेस दरम्‍यान एकमेकांवर आदळलेल्‍या कारमध्‍ये फ्रेंचचा ड्रायव्हर ज्युलिस बिनाचीची गाडी अपघातग्रस्त झाल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात बिना गंभीररीत्या जखमी झाला असून त्‍याची शुध्‍द हरपली आहे.
ज्‍युलिस बिनाच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून डॉक्‍टरांनी त्‍याच्‍या डोक्‍यावर सर्जरी केली. 18 तासानंतरही त्‍याची परिस्थिती चिंताजनक आहे. आंतरराष्‍ट्रीय ऑटोमोबाईल संघ (एफआयए) यांनी म्‍हटले की, ज्‍यूलिस सध्‍या डॉक्‍टरांच्‍या निगराणीमध्‍ये आहे.
पावसामुळे झाला अपघात
एफआयए यांनी अपघाताचा हवाला देताना म्‍हटले की, ‘पावसामुळे ट्रॅक निसरडा बनला होता. 42 व्‍या लॅपमध्‍ये सॉबरचा ड्रायव्‍हर एड्रियन सुतिलची कार भिंतीवर आदळली. त्‍याच्‍या मदतीसाठी रेस्‍क्यू टीम पोहोचत नाही तोच सुतिलची कार काढेपर्यंत ज्‍युलिस बिनाची कार अन्‍य कारवर आदळली.
टक्कर होताच बिनाची बेशुध्‍द झाला
बिनाचीच्‍या गाडीची अन्‍य गाडीला धडक बसताचा ज्‍युलिस बेशुध्‍द पडला होता. त्‍याला तात्‍काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. पावसामुळे हेलिकॉप्टरने मदत केल्‍या जावू शकली नाही.
एकवर्षांपूर्वीच केले पदार्पन
25 वर्षीय बिनाचीने 2013 मध्‍ये मारूसियाकडून एफ-1 रेसमध्‍ये पदार्पन केले होते. यापूर्वी तो फेरारी आणि फोर्स इंडियाचा टेस्ट ड्राइव्‍हर होता. 2014 च्‍या रेसमध्‍ये तो 16 व्‍या नंबरवर होता.
हॅमिल्टनने जिंकली रेस
मर्सिडीझचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टनने शानदार प्रदर्शन करताना जपान ग्रँडप्रिक्स फॉर्म्युला वन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याच्याच संघाच्या निको रोसबर्गला वरचढ ठरत त्याने बाजी मारली. रोसबर्गने दुसरे स्थान पटकावले.
टॉप-10 रेसर
खिलाड़ी
टीम
गुण
लुइस हॅमिल्टन
मर्सिडीज
25
निको रोसबर्ग
मर्सिडीज
18
सेबेस्टियन वेटल
रेडबुल
15
डेनियल रिकियार्डो
रेडबुल
12
जेन्सन बुटोन
मॅक्लारेन
10
वेल्तेरी बोटास
विलियम्स
8
फिलिप मासा
विलियम्स
6
निको हल्केनबर्ग
फोर्स इंडिया
4
जीन एरिक
एसटीआर
2
सर्गियो पेरेज
फोर्स इंडिया
1
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रांच्‍या माध्‍यमातून एफ 1 कोर्टवरील थरार ...