आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅम्बुर्ग ओपन टेनिस स्पर्धा: फाबियो फोगनिनीला अजिंक्यपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅम्बुर्ग- इटलीचा फाबियो फोगनिनीने हॅम्बुर्ग ओपन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. त्याचा हा सलग दुसरा एटीपी किताब ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फेडेरिको डेलबोनिसवर मात केली. फाबियोने 4-6, 7-6, 6-2 अशा फरकाने सामना जिंकला.

अर्जेंटिनाच्या डेलबोनिसने उपांत्य लढतीत रॉजर फेडररवर सनासनाटी विजय मिळवला होता. मात्र, त्याला विजेतेपद पटकावता आले नाही. जागतिक क्रमवारीत 114 व्या स्थानी असलेल्या डेलबोनिसने अंतिम सामन्यात दमदार सुरुवात करताना पहिला सेट 6-4 ने जिंकला.

मात्र, दुसर्‍या सेटमध्ये त्याचा 12 व्या मानांकित फोगनिनीसमोर निभाव लागला नाही. दरम्यान, त्याने अनेक मॅच पॉइंट गमावले. दुसर्‍या सेटमध्ये फोगनिनीने 1-4 ने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करत 4-4 ने बरोबरी साधली. त्यानंतर त्याने दुसरा सेट त्याने जिंकला. फोगनिनीने तिसर्‍या निर्णायक सेटमध्ये 3-0 ने दमदार सुरुवात केली. त्याने दोन तास 27 मिनिटांत विजेतेपद आपल्या नावे केले.