आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts And Photos Of Sourav Ganguly, Divya Marathi

B\'DAY: सौरव गांगलीने केले होते दोनदा लग्‍न, वाचा Facts आणि पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - सौरव गांगुली आणि डोना गांगुली)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज 42 वा वाढदिवस आहे. त्‍याचा जन्‍म 8 जुलै 1972 रोजी कोलकात्‍यामध्‍ये झाला. भलेही क्रिकेटपासून गांगुली आज दुर असेल परंतु आजही त्‍याची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्‍याच्‍या खासगी आयुष्‍याविषयी लोकांना खूप कमी माहिती आहे. सौरवने आतापर्यंत दोनवेळ लग्‍न केले आहे.
गांगुलीचे वडील उद्योगपती होते. तर आई सामाजिक कार्यकर्ती होती. कोलकात्‍यामध्‍ये फुटबॉल हा खेळ खूप लोकप्रिय असताना गांगुली क्रिकेटकडे वळला. त्‍याच्‍या आईचा सुध्‍दा या निर्णयाला विरोध होता.

गांगुलीचे खासगी आयुष्‍य अगदी आनंददायी असले तरीही त्‍याची क्रिकेट कारकीर्द आणि लव्‍ह लाईफ फिल्‍म स्‍टोरीपेक्षा कमी नाही.
सौरव आणि डोनाची लव्‍ह- स्‍टोरी

- सौरव आणि डोना शेजारी होते. परंतु दोन्‍ही परिवारामध्‍ये पटत नव्‍हते.
- दोघेही वेगवेगळ्या शाळेमध्‍ये शिकत होते. शाळेपासूनच यांची लव्‍हस्‍टोरी सुरु झाली. घरच्‍यांचा दोघांनाही विरोध होता.
-1996 मध्ये इंग्‍लड दौ-यावर जाण्‍यापूर्वी सौरवने डोनाला प्रपोज केले होते.
- इंग्‍लडहून परतल्‍यानंतर दोघांनी मित्राच्‍या मदतीने कोर्ट मॅरेज करण्‍याचे ठरविले.
- रजिस्‍टर पध्‍दतीने गुपचून लग्‍न करायला गेले असता, ही गोष्‍ट माध्‍यमांना माहिती झाली आणि लग्‍न न करताच सौरव आणि डोना परत आले.
- त्‍यानंतर 12 ऑगस्‍ट 1996 मध्‍ये दोघांनी गुपचूप कोर्टमॅरेज केले. लग्‍नानंतर कुटुंबियांना तसेच माध्‍यमांना ही गोष्‍ट गांगुलीने सांगितली नाही. आणि श्रीलंका दौ-यावर निघून गेला.
- घरच्‍यांचा विरोध शेवटी मावळला. आणि 21 फेब्रुवारी 1997 रोजी सौरव आणि डोनाचे रिती-रिवाजाप्रमाणे लग्‍न करण्‍यात आले.
-सौरव आणि डोना ला एक मुलगी आहे. तिचे नाव सना आहे.
सौरव गांगुलीच्‍या फेव्‍हरेट गोष्‍टी

फेव्‍हरेट कार- रेड मर्सडीज
फेव्‍हरेट खेल- क्रिकेट आणि फुटबॉल
फेव्‍हरेट क्रिकेटर्स- सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड़, ब्रायन लारा, स्टीव वॉ
फेव्‍हरेट फुटबॉलर- पेले, ब्राजील
फेव्‍हरेट टेनिस प्लेयर्स- पीट सॅम्प्रास, लिएंडर पेस
फेव्‍हरेट स्पोर्ट्सवुमन- स्टेफी ग्राफ
फेव्‍हरेट एक्टर्स- अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सौमित्र चॅटर्जी
फेव्‍हरेट एक्ट्रेस- ऐश्वर्या राय, रवीना टंडन
फेव्‍हरेट फिल्म- शोले
फेव्‍हरेट फूड- बिरयानी, बंगाली डिशेज, थाई फूड
फेव्‍हरेट हॉलिडे डेस्टिनेशन- लंडन आणि दार्जलिंग (भारत)
फेव्‍हरेट सिटी- लंडन आणि कोलकाता
फेव्‍हरेट ऑथर- सत्यजीत रे

पुढील स्‍लाइडवर पाहा, गांगुलीची पत्‍नी डोना आणि मुलगी सनाची छायाचित्रे..