आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Failed In Test, Runs In One Day Satisfactory Raina

कसोटीत अपयश; वनडेतील धावांवर समाधान - रैना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - कसोटीतील अपयशानंतर एकदिवसीय मालिकेच्या प्रारंभी माझ्यासह संघाच्या धावादेखील चांगल्या प्रमाणात होण्यास प्रारंभ झाल्याने भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैनाने समाधान व्यक्त केले आहे.

दोन वर्षांनंतर कसोटीत परतलेल्या रैनाला दोन्ही डावांत खातेच न उघडता माघारी परतावे लागले होते. त्यामुळे कसोटीतील अपयशानंतर पुन्हा एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकी खेळीने दिलासा मिळाल्याचे रैनाने नमूद केले. तब्बल दोन वर्षांनंतर आलेल्या संधीसाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र, ती चौथी कसोटी म्हणजे माझ्यासाठी एक दु:स्वप्न ठरले. यापूर्वी २०११ मध्येदेखील मी कसोटीत असाच अपयशी ठरल्यानंतर एकदिवसीय सामन्यात मात्र मला चांगले यश मिळाले होते. मात्र, चौथ्या कसोटीतील अपयशाचा विचार मागे टाकत मी वनडेसाठी पुन्हा नव्याने सराव करत मी धावा करू शकलो. संघाला गोलंदाजीत अजून खूप सुधारणा करावी लागणार असून त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही रैनाने नमूद केले.