आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Royal Challengers Bangalore Brought Sarfaraj For 50 Lacks

IPL: वडीलांसाठी SUV विकत घेणार 50 लाखांमध्ये निलाम झालेला 17 वर्षीय सरफराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) सीजन 8 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 17 वर्षीय क्रिकेटर सरफराज खान याला 50 लाख रुपयांना विकत घेतले आहे. सोमवारी झालेल्या ऑक्शनमधील सरफराज सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे. सरफराजची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.
निलामी झाल्यावर सरफराज म्हणाला, की यानंतर माझ्या राहणीमानात कोणताही बदल होणार नाही. पण मला पहिले वडीलांसाठी कार खरेदी करायची आहे. 2010 मध्ये एका अपघातात माझ्या वडीलांच्या गुडघ्याला दुखापत झाली. तेव्हा मी खुप घाबरलो होतो. मला माझ्या वडीलांना अगदी तंदुरुस्त बघायचे आहे. अपघातानंतर माझे वडील गुडघ्यांच्या दुखण्याने ग्रस्त आहेत.
एसयुव्ही विकत घेण्याची इच्छा
सरफराज म्हणाला, की वडीलांचा अपघात झाला तेव्हाच मी पक्के केले होते, की माझ्याजवळ जेव्हा खुप पैसे येतील तेव्हा वडीलांसाठी कार खरेदी करणार. यासाठी मी पैसे जमा करण्यास सुरवात केली होती. पण कार घेण्यासाठी हे पुरेसे नव्हते. आता या निलामीने मी त्यांच्यासाठी कार विकत घेऊ शकतो.
वडील नौशाद आहेत क्रिकेट कोच
सरफराजचे वडील क्रिकेट कोच आहेत. सरफराज आणि मुशीर या दोघांना कु्र्ला येथून आझाद मैदानावर घेऊन जाण्यासाठी दररोज दुचाकीचा वापर करतात. सरफराज सांगतो, की बाईकवर दोन क्रिकेट किट आणि आम्ही तिघे असा प्रवास करावा लागतो. तो धोकादायक आहे. पण पर्याय नाही. लोकलने जायचे म्हटले, तर खुप वेळ जातो.
पुढील स्लाईडवर वाचा, सरफराजचे क्रिकेट करिअर...