आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Famous Controversy On Ground In Between Venkatesh Prasad And Aamir Sohail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'DAY SPL: अन् व्‍यंकटेश प्रसादने अशी जिरवली आमिर सोहेलची, पाहा व्‍ि‍हडिओ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बापू कृष्‍णराव व्‍यंकटेश प्रसाद म्‍हणजेच आपल्‍या टीम इंडियाचा माजी मध्‍यमगती गोलंदाज व्‍यंकटेश प्रसादचा आज (5 ऑगस्‍ट) वाढदिवस आहे. 1996 साली पदार्पण करणा-या प्रसादने 2005 सालापर्यंत टीम इंडियामध्‍ये गोलंदाजांची धुरा सांभाळली. प्रसाद ज्‍यावेळी संघात आला त्‍यावेळी टीम इंडियाला वेगवान गोलंदाजांची उणीव भासत होती. त्‍याने आपल्‍या कामगिरीने ही उणीव दूर करण्‍याचा काही अंशी प्रयत्‍न केला. त्‍याकाळी जवागल श्रीनाथ आणि व्‍यंकटेश प्रसादची वेगवान दुकली जगभरात प्रसिद्ध होती. उल्‍लेखनीय म्‍हणजे, दोघेही कर्नाटकचेच होते.

प्रसादने टीम इंडियाकडून 33 कसोटीत 96 आणि 161 वनडेमध्‍ये 196 विकेट घेतल्‍या आहेत. विशेषत: टीम इंडिचा कट्टर प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानबरोबर त्‍याची कामगिरी कायमच वरचढ ठरली आहे.

परंतु, व्‍यंकटेश प्रसाद क्रिकेट चाहत्‍यांच्‍या लक्षात राहिला तो भारतात 1996 साली झालेल्‍या विश्‍वचषकातील पाकिस्‍तानविरूद्ध सामन्‍यासाठी. बंगळूरू येथील क्‍वॉटर्र फायनल सामन्‍यात टीम इंडियाने पाकिस्‍तानला 288 धावांचे आव्‍हान दिले होते. टीम इंडियाच्‍या या धावांच्‍या डोंगराला आमिर सोहेल आणि सईद अन्‍वर या पाकच्‍या सलामीवीरांनी तडाखेबाज उत्तर दिले होते.

15व्‍या षटकांत अर्धशतकवीर आमिर सोहेलने प्रसादला कव्‍हरच्‍या दिशेने चौकार मारला. या चौकारानंतर या दोघांमध्‍ये थोडी शाब्दिक बाचाबाची झाली. सोहलने त्‍याला हातवारे करीत इशारे केले. त्‍यानंतरचा दुसरा चेंडू प्रसादने स्‍लोअर टाकला, त्‍यालाही आधीसारख्‍याच पद्धतीने सोहेलचा प्रयत्‍न फसला आणि चेंडूने यष्‍टया उडवल्‍या. या विकेटनंतर प्रेक्षकांच्‍या आवाजांनी स्‍टेडिअम अक्षरश: दुमदुमले.

सोहेल बाद झाल्‍यानंतर प्रसादनेही त्‍याला पॅव्‍हेलियनमध्‍ये जाण्‍याचा इशारा केला. यावर सोहेलकडे कुठलेच उत्तर नव्‍हते. तो सरळ खाली मान घालून पॅव्‍हेलियनमध्‍ये परतला. व्‍यंकटेश प्रसाद या सामन्‍याचा हिरोच ठरला.

क्रिकेट चाहते हा क्षण कधीच विसरू शकणार नाहीत. प्रसाद सध्‍या उत्तर प्रदेश रणजी टीमचा प्रशिक्षक आहे.

व्‍यंकटेश प्रसादने कशी घेतली आमिर सोहेलची विकेट पाहा व्हिडिओमध्‍ये...