आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Controversy On Ground In Between Venkatesh Prasad And Aamir Sohail

अन् अशी जिरवली भारताच्‍या बॉलरने पाकच्‍या आमिर सोहेलची, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सख्‍खे शेजारी, पक्‍के वैरी' ही म्‍हण भारत-पाकला तंतोतंत लागू पडते. विशेषत: भारत भारत-पाक क्रिकेट सामना म्‍हणजे प्रचंड इर्षा, जोष, खुन्‍नस, शाब्‍दीक फटकेबाजी, शेरेबाजी यामुळे चांगलाच गाजत असतो. असेच एक उत्‍तम उदाहरण आहे 1996 च्‍या विश्‍वचषकाचे. भारताचा व्‍यंकटेश प्रसाद आणि पाकिस्‍तानचा सोहेल यांच्‍यामध्‍ये बाचाबाची झाली होती. सोहेलने प्रसादला डिवचण्‍याचा प्रयत्‍न केला आणि जिगरबाज प्रसादने दुस-याच चेंडूत त्‍याला तंबूचा रस्‍ता दाखविला.
अन् सोहेलची जिरवली
परंतु, व्‍यंकटेश प्रसाद क्रिकेट चाहत्‍यांच्‍या लक्षात राहिला तो भारतात 1996 साली झालेल्‍या विश्‍वचषकातील पाकिस्‍तानविरूद्ध सामन्‍यासाठी. बंगळूरू येथील क्‍वॉटर्र फायनल सामन्‍यात टीम इंडियाने पाकिस्‍तानला 288 धावांचे आव्‍हान दिले होते. टीम इंडियाच्‍या या धावांच्‍या डोंगराला आमिर सोहेल आणि सईद अन्‍वर या पाकच्‍या सलामीवीरांनी तडाखेबाज उत्तर दिले होते.
15व्‍या षटकांत अर्धशतकवीर आमिर सोहेलने प्रसादला कव्‍हरच्‍या दिशेने चौकार मारला. या चौकारानंतर या दोघांमध्‍ये थोडी शाब्दिक बाचाबाची झाली. सोहलने त्‍याला हातवारे करीत इशारे केले. त्‍यानंतरचा दुसरा चेंडू प्रसादने स्‍लोअर टाकला, त्‍यालाही आधीसारख्‍याच पद्धतीने सोहेलचा प्रयत्‍न फसला आणि चेंडूने यष्‍टया उडवल्‍या. या विकेटनंतर प्रेक्षकांच्‍या आवाजांनी स्‍टेडिअम अक्षरश: दुमदुमले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कोण आहे व्‍यंकटेश प्रसाद, पाकिस्‍तानसोबत कसा द्यायचा खुन्‍नस, त्‍याची कारकीर्द,.. अंतीम स्‍लाइडवर VIDEO