आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Sledging Incidents During World Cup Cricket

WC मधील प्रसिध्‍द स्लेजिंग, रवी शास्त्रीने केली होती कांगारुची बोलती बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक 2015 दोन दिवसांवर येऊन ठेवला आहे. जिंकण्‍यासाठी खेळाडूंनी आपापली प्‍लॅनिंग केली आहे. प्रतिस्‍पर्धी खेळाडूला डिवचून त्‍याचे संतुलन भंग करण्‍याचा खेळाडू प्रयत्‍न करत असतात. अशेच काही किस्‍से आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. जे क्रिकेटजगातामध्‍ये खुपच लोकप्रिय आहेत.
(फोटो - ऑस्ट्रेलियाचा व्हिटनी (डावीकडे) आणि रवी शास्त्री)
शास्त्रीने केली कांगारुची बोलती बंद बंद
1992 मध्‍ये रवी शास्त्री धाव घेत होता. त्‍यावेळी ऑस्‍ट्रेलियाच्‍या व्हिटनीने त्‍याला 'एक पाऊल पुढे आला तर डोके फोडीन' असे म्‍हटले होते. तेव्‍हा शास्‍त्रींनी तात्‍काळ उत्‍तर दिले होते- 'तू एवढा चांगला खेळतोस म्‍हणूनच तुला 12 वा खेळाडू म्‍हणून घेतले.

विश्‍वचषकात स्‍लेजिंगला प्रतिबंध
खेळाडूंचे मैदानावरील वर्तन बेशिस्तीच निदर्शनास आल्‍यास त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात येईल. दोषी खेळाडूंवर तात्‍काळ बंदी घालण्‍यात येईल, अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड रिचर्डसन यांनी पत्रकारांना दिली.
रिचर्डसन पुढे म्‍हणाले की, गेल्या काही सामन्यांत "स्लेजिंग‘ची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. क्रिकेटमध्ये येणाऱ्या भावीपिढीसमोर हे चांगले उदाहरण नाही, गेल्या काही सामन्यांतून अशी तेरा ते चौदा प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे विश्‍वकरंडक स्पर्धा तणावविरहित व्हावी, यासाठी आम्ही काळजी घेतली आहे. मैदानावरील पंचांना अंतिम अधिकार असतील आणि त्यांच्या अहवालानुसार निरीक्षक खेळाडूवरील कारवाईचा निर्णय घेतील. असेही ते म्‍हणाले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, क्रिकेट जगतातील सर्वांत जास्‍त चर्चित स्लेजिंगचे किस्से...