आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fans Pelt Stones At Dhoni S Residence Before Ranchi ODI

PHOTOS: धोनीच्‍या घरी आलेल्‍या पाहुण्‍यांसमोर चाहत्‍यांची दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- कोची येथे सामना जिंकलेल्‍या टीम इंडियाचे तिस-या सामन्‍यासाठी रांची येथे बुधवारी आगमन झाले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खास टीमसाठी रांचीतील आपल्‍या घरी पार्टी दिली. धोनीच्‍या घरी टीम इंडिया आल्‍याचे कळताच चाहत्‍यांची एकच गर्दी उसळली.

चाहत्‍यांनी टीम इंडियाच्‍या खेळाडूंची एक झलक हवी होती. मात्र, खूप वेळ झाला तरी एकही खेळाडू बाहेर आला नाही. तेव्‍हा उपस्थित प्रेक्षक भडकले. भडकलेल्‍या प्रेक्षकांनी धोनीच्‍या घरावर दगड फेकण्‍यास सुरूवात केली. या दगडफेकीमुळे खिडक्‍यांच्‍या काचादेखील फुटल्‍या.

चाहत्‍यांचा हा रूद्रअवतार पाहून धोनीच्‍या बहिणीचे पती गौतम गुप्‍ता बाहेर आले आणि त्‍यांनी शांततेचे आवाहन केले. गुप्‍ता यांनी घरी आलेल्‍या पाहुण्‍यांसमोर असे करणे उचित नसल्‍याचे सांगितल्‍यानंतर चाहते शांत झाले.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा धोनीच्‍या स्‍वागताची खास छायाचित्रे...