आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप सचिनला: वानखेडे लाइव्ह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन आऊट ... सेलिब्रिटी आऊट
सचिन तेंडुलकर बॅटिंग ऑन 74... वेस्ट इंडीजचा देवनारायण सचिनला गोलंदाजी करत होता. आणि अचानक स्टेडियममध्ये शांतता पसरली. ओह नो..., बापरे..., आयला..., गेला... अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या तोंडून निघाल्या. सचिन तेंडुलकर कॉट सामी बोल्ड नारायण 74 अशी स्कोअररने माहिती दिली. आणि अक्षरश: काही मिनिटांमध्ये स्टेडियममधील गर्दी विरळ होऊ लागली. रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, राहुल बोस, राज ठाकरे आदींनी स्टेडियममधून जाणेच पसंत केले.
वानखेडेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त
सचिनच्या 200 व्या कसोटीसाठी वानखेडे स्टेडियमला नेहमीपेक्षा अधिकच पोलिस बंदोबस्त होता. मुंबई पोलिस, फोर्स वन, बॉम्ब स्क्वॉड आणि खासगी सुरक्षा रक्षकांचा गराडा स्टेडियमच्या आत आणि बाहेर होता. स्टेडियममध्ये शिरणा-या प्रत्येक व्यक्तीची अंगझडती घेतली जात होती. खिशात असलेली पैशाची नाणी काढून घेण्यात आली. पोलिसांच्या माहितीप्रमाणे पहिल्या दिवशी सुमारे चार हजार रुपयांची सुटी नाणी जमा झाली आणि ती नजीकच्या पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. मात्र आज म्हणजेच दुस-या दिवशी सुटी नाणी काढून घेण्याचा निर्णय फिरविण्यात आला.
अन्... आई घरी परतली
सचिनचा सामना पाहण्यासाठी आई रजनी तेंडुलकर प्रथम वानखेडे स्टेडियमवर आल्या होत्या. विंडीजविरुद्ध कसोटीत भारताची दुस-या दिवशी चांगली सुरुवात झाली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर वानखेडेवर चाहत्यांनी जल्लोष केला. त्या वेळी रजनी तेंडुलकर हे चित्र पाहत होत्या. मात्र, 74 धावांवर असताना सचिन झेलबाद झाला अन् त्यांनी लगेच प्रेसिडेंट बॉक्समधून काढता पाय घेतला. सचिन बाद होताच शांतता पसरली. दरम्यान, सचिनची आई अधिकच भावुक झाली. या वेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते.