आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farewell To Sachin : 15 November Verses 15 November

निरोप सचिनला: 15 नोव्हेंबर विरूध्‍द 15 नोव्हेंबर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 नोव्हेंबर 1989
पाकिस्तानविरुद्ध
कराचीत कसोटी पदार्पण केले. 15 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने फलंदाजी केली. त्या दिवशी सचिनने
क्षेत्ररक्षण केले. त्याला फलंदाजीची संधी तिस-या दिवशी मिळाली.
15 नोव्हेंबर 2013 :
विंडीजविरुद्ध मुंबईत अखेरचा कसोटी सामना. फलंदाजीची संधी बहुधा पुन्हा मिळणार नाही. याचाच अर्थ 15 नोव्हेंबर रोजीच एक फलंदाज म्हणून निवृत्ती. एक क्षेत्ररक्षक म्हणून तो शनिवारीसुद्धा मैदानावर दिसेल. औपचारिक निवृत्ती कसोटी संपल्यानंतर.
दुन‍ियेचा सलाम
टाइम मॅगझिन
जगातील एक महान खेळाडू सध्या आपला अखेरचा सामना खेळत आहे. त्याच्या निवृत्तीमुळे चाहते प्रचंड निराश आहेत. त्याच्यानंतर एक पोकळी निर्माण होईल. संपूर्ण देशाला आता सचिनच्या आठवणींची मदत असेल, असे ‘टाइम’ने लिहिले आहे.
‘डॉन’कडून स्तुती
पाकिस्तानी वर्तमानपत्रांतही सचिनचा उदो उदो आहे. ‘सचिनची जादू त्याच्या अखेरच्या सामन्यातही दिसली. शतकाकडे आगेकूच करीत असलेला सचिन बाद होताच स्टेडियममध्ये भयाण शांतता पसरली. सचिन बाद झाला आहे, यावर क्षणभर चाहत्यांचा विश्वासच बसला नाही. याची जाणीव होताच, सर्वांनी उभे राहून सचिनला सलाम केला,’ असे ‘डॉन’ने लिहिले आहे.