आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fed Cup : Prathana Two Success, India Defeated Pakistan

फेड चषक: प्रार्थनाचा डबल धमाका; भारताकडून पाकचा धुव्वा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्ताना - भारतीय टेनिस संघाने फेड चषक टेनिस स्पर्धेत पाकिस्तानचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. भारताचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला. यापूर्वी टीमने सलामी सामन्यात इराणला पराभूत केले होते. सोलापूरची युवा खेळाडू प्रार्थना ठोंबरेचा डबल धमाका आणि नंबर वन अंकिता रैनाने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने एकतर्फी विजय मिळवला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. या गटात प्रत्येकी तीन संघांचा समावेश करण्यात आला. भारताने आपल्या गटातील तीन सामने जिंकले आहेत.
भारताच्या अंकिता रैनाने सामन्यात सारा मन्सूरला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. तिने 6-1, 6-2 अशा फरकाने सामना जिंकला. दुस-या सेटमध्ये पाकच्या साराने प्रत्युत्तराचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फार काळ निभाव लागला नाही. आक्रमक सर्व्हिस करताना अंकिताने सामना जिंकला. यासह तिने भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. अंकिता इराणविरुद्ध गत सामन्यात खेळली नव्हती. दरम्यान, तिने पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. या वेळी सामन्यात बाजी मारून नंबर वन खेळाडूने भारतीय संघाला लढतीत विजयाचे खाते उघडून दिले.
प्रार्थनाचे दुहेरी यश
सोलापूरच्या प्रार्थना ठोंबरेने पाकविरुद्ध विजयाचा डबल धमाका उडवला. तिने एकेरीसह दुहेरीत बाजी मारून भारताचा एकतर्फी विजय निश्चित केला. तिने एकेरीत उश्ना सुहेलला धूळ चारली. तिने 6-0, 6-1 ने सामना आपल्या नावे केला. हीच विजयी लय तिने महिला दुहेरीच्या लढतीतही कायम ठेवली. तिने रिशिका सुंकारासोबत दुहेरीचा सामना जिंकला. या जोडीने सारा मन्सूर आणि सुहेलला 6-2, 6-1 ने पराभूत केले.
भारताला हॅट्ट्रिकची आज संधी
भारताला स्पर्धेत शुक्रवारी विजयी हॅट्ट्रिकची संधी आहे. इराणपाठोपाठ पाकिस्तानला धूळ चारणा-या भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडशी होईल.