आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरर सेमीफायनलमध्ये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - दुस -या मानांकित रॉजर फेडरर व इंग्लंडचा अ‍ॅँडी मुरेने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात व्हिक्टोरिया अजारेंकाने ठेवत उपांत्य फेरी गाठली.
स्विसचा स्टार खेळाडू रॉजर फेडररने उपांत्यपूर्वच्या फेरीत रोमांचक विजय मिळवला. त्याने फ्रान्सच्या ज्यो विल्फ्रेंड त्सोंगाला 7-6, 4-6, 7-6, 3-6, 6-3 अशा फरकाने धूळ चारली.
महिला एकेरीच्या लढतीत बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोवावर 7-5, 6-1 ने मात केली.
अँडी मुरे उपांत्य फेरीत
यूएस ओपन चॅम्पियन अ‍ॅँडी मुरेने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने बिगर मानाांकित जर्मी चार्डीला 6-4, 6-1, 6-2 ने पराभूत केले. मुरेचा उपांत्य सामना स्विसच्या फेडररसोबत होणार आहे.
बोपन्ना-सु वेई पराभूत
भारताचा रोहन बोपन्ना व सु वेई या जोडीचा चेक गणराज्यच्या क्वेटा पेश्चेक व पोलंडची मर्सिन मेैतकोविस्कीने 6-2, 6-3 ने पराभव केला.
सेरेनाचे पॅकअप
तिस -या मानांकित सेरेना विल्यम्सला बुधवारी ऑ स्ट्रेलियन ओपन टेनिसमधून पॅकअप करावे लागले. तिला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीतील अमेरिकेच्या नवोदित स्लोएन स्टीफन्सने धूळ चारली. पहिल्या फेरीपासून सेरेना गुडघ्याच्या गंभीर दुखापतीने त्रस्त होती. तिला 19 वर्षीय स्लोएनने 3-6, 7-5, 6-4 अशा फरकाने धूळ चारली. लढतीच्या सुरुवातीला सेरेनाने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला आणि पहिला सेट 28 मिनिटांमध्ये जिंकला. दुस -या सेटमध्येही तिने 2-0 ने आघाडी घेतली होती. मात्र, स्लोएनने दमदार पुनरागमन केले.