आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेलबर्न - स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत जगातली नंबर वन खेळाडू बेलारूसची व्हिक्टोरिया अजारेंका आणि सेरेना विल्यम्स यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने रशियाच्या एलिना वेस्निनालासहजपणे 6-1, 6-1 ने हरवले.
ग्रँडस्लॅम विजयाचा प्रबळ दावेदार फेडररने कॅनडाच्या मिलोस राओनिकला 6-4, 7-6, 6-2 ने हरवले. या विजयासह त्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश् केला. फेडररचे हे सलग 35 वे ग्रँडस्लॅम क्वार्टर फायनल ठरले.
महिला गटात सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया किरिलेंकोला सहजपणे 6-2, 6-2 ने मात दिली. दुसरीकडे अजारेंकाचा पुढचा सामना दोन वेळेसची ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्वेतलाना कुज्नेत्सेवाशी होईल.
फ्रान्सच्या खेळाडूंचे यश
दुसरीकडे फ्रान्सच्या खेळाडूंसाठी सामने रोमांचक ठरले. 1998 नंतर प्रथमच फ्रान्सच्या चार पुरुष खेळाडूंनी अंतिम 16 खेळाडूंत प्रवेश निश्िचत केला. फ्रान्सच्या जर्मी चार्डीने रोमांचक लढतीत 21 वा मानांकित इटलीच्या आंद्रियस सेनीला 5-7, 6-3, 6-2, 6-2 ने हरवत पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. जागतिक क्रमवारीत 36 व्या क्रमांकावर असलेल्या चार्डीने अतिशय संथ सुरुवात केली. मात्र, नंतर त्याने खेळात पुनरागमन करताना उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.
इतर खेळाडूंची कामगिरी
यापूर्वी चार्डीने 2008 मध्ये फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला होता. तेथे त्याला स्पेनच्या निकोलस आलमार्गोने हरवले होते. 25 वर्षी चार्डीला यापूर्वी सहा वेळा ऑ स्ट्रेलियन ओपनमध्ये केवळ दुस-या फेरीपर्यंत प्रवेश करता आला. इतर सामन्यांत सातवा मानांकित फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाने आपल्याच देशाच्या रिचर्ड गास्केटला 6-4, 3-6, 6-3, 6-2 ने नमवत चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सातवा मानांकित सोंगाने पहिल्या सर्ववर बहुतेक गुण मिळवले. दमदार विनर्स मारून त्याने नववा मानांकित गास्केटच्या हातून सामना खेचला. सोंगाने दुसरा सेट गमावला होता. मात्र, 140 मिनिटांनंतर 27 वर्षीय फ्रान्सच्या सोंगाने विजयासह क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. सोंगाने 2008 मध्ये याच फेरीत गास्केटला पराभूत केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.