आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरर, मुरेची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस मध्‍ये विजयी सलामी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेला पुरुष एकेरीचा खेळाडू रॉजर फेडरर आणि इंग्लंडचा तिस-या क्रमांकाचा अँडी मुरे यांनी सहजपणे ऑ स्ट्रेलियन ओपनची दुसरी फेरी गाठली. महिला गटात अव्वल मानांकित बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका आणि तिस-या क्रमांकाची अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनीसुद्धा आपले विजयी अभियान कायम ठेवले. महिला गटातच 12 वी मानांकित रशियाच्या नादिया पेत्रोवाला बिगर मानांकित किमिको डेट क्रुककरवी 2-6, 0-6 ने पराभवाचा सामना करावा लागला.

फेडररने फ्रान्सचा बेनोएट पेयरेला सरळ सेटमध्ये 6-2, 6-4, 6-1 ने हरवले. मुरेने हॉलंडच्या रॉबिन हासला 6-3, 6-1, 6-3 ने मात दिली. महिला एकेरीत अपेक्षेनुरूप अझारेंकाने रोमानियाच्या मोनिका निकुलेस्क हिला 6-1, 6-4 ने हरवले. विजेतेपदाची प्रबळ दावेदार सेरेनाने बिगर मानांकित रोमानियाच्या एदिना गॅलोवित्स हॉलला 6-0, 6-0 ने नमवत शानदार सुरुवात केली.

अँडी मुरे-रॉबिन सामना : इंग्लंडच्या अँडी मुरेने जगातील 53 व्या क्रमांकाचा खेळाडू आणि बिगर मानांकित रॉबिनविरुद्ध सामन्यात सुरुवातीपासून
अखेरपर्यंत आपली पकड कायम ठेवली. मुरेने एक तास आणि 37 मिनिटांत 25 विनर
मारताना सामना आपल्या नावे केला. मुरेने या काळात रॉबिनच्या 35 सामान्य चुकांच्या तुलनेत 20 चुका केल्या. आता त्याचा पुढचा सामना पोर्तुगालच्या जोआओ सोसाशी होईल. महिला एकेरीत अझारेंकाने मोनिकाला सरळ सेटमध्ये 6-1, 6-4 ने नमवले. तिला विजय मिळवण्यासाठी एक तास आणि 27 मिनिटांचा वेळ लागला. अझारेंकाने पहिला सेट 31 मिनिटांत 6-1 ने सहजपणे जिंकला. दुसरा सेट तिने 56 मिनिटांत आपल्या नावे केला. तिचा सामना एलेली देनीलियदोऊ आणि चेक गणराज्यच्या कॅरोलिन प्लिस्कोवा यांच्यातील विजेत्याशी होईल.

फेडरर-पेयरे सामना रंगला
पहिल्या सेटमध्ये फेडररने शानदार सर्व्हिस आणि व्हॉली गेमचे प्रदर्शन करताना 25 मिनिटांत विजय मिळवला. दुसरा सेट त्याने 36 मिनिटांत आणि तिसरा सेट 22 मिनिटांत आपल्या नावे केला. फेडररचा पुढचा सामना इस्रायलच्या डुडी सेला आणि रशियाचा निलोये देवदेंको यांच्यातील विजेत्याशी होईल.

हेसुद्धा दुस-या फेरीत पोहोचले
पुरुष गटात उझबेकिस्तानचा डेनिस इस्तोमिन, 25 वा मानांकित जर्मनचा लोरियन मेयर, कोलंबियाचा अ‍ॅलेक्झांद्रो फालो, इस्रायलचा आमिर विनत्रोब, 21 वा मानांकित इटलीचा आंद्रेस सेप्पी, 17 वा मानांकित जर्मनीचा फिलिप कोलश्वेबर यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला. महिला गटात आठवी मानांकित चेक गणराज्याची पेत्रा क्वितोवा, इटलीची फ्रान्सिस्को शियावोनने 6-4, 2-6, 6-2 ने, तर 10 वी मानांकित डेन्मार्कच्या वोज्नियाकीने दुसरी फेरी गाठली.