टेनिसपटू रॉजर फेडररच्या घरी मंगळवारी चमत्कार झाला आहे. त्याच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. उल्लेखनिय असे की यापूर्वी 2009 मध्ये फेडररला पाच वर्षांपूर्वी रॉजर आणि मिर्का फेडरर दांपत्याला जुळे कन्यारत्न झाले होते.
ट्विटरवर दिली गोड बातमी
"लिओ आणि लेनी या जुळ्या मुलांना मिर्काने जन्म दिला असून, सर्व चाहत्यांना ही गोष्ट सांगताना अत्यंत आनंद होत आहे." असे ट्विट फेडररने केले आहे.
दुर्मीळ योग
एकाच दांपत्याला सलग जुळे मुले होणे हा अत्यंत दुर्मिळ योग असल्याचे मानले जाते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संशोधन पेपरमध्ये उल्लेखित केल्यानुसार जगभरातील 7 लाख जोडप्यांमधून एका जोडप्याशी असा योग येवू शकतो.
पुढील स्लाइडवर पाहा, फेडररचे हॅप्पी 'डबल्स' फॅमिलीची छायाचित्रे...