आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Federer Loses To Nishikori In Sony Open Quarters

सोनी ओपन टेनिस स्पर्धा : नोवाक योकोविक उपांत्य फेरीत; मरे, फेडरर बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - जगातील माजी नंबर वन नोवाक योकोविकने सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे स्विसचा रॉजर फेडरर आणि विम्बल्डन चॅम्पियन अँडी मरेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला गटात चीनची ली नानेही अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला.

योकोविकने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत इंग्लंडच्या अँँडी मरेचा पराभव केला. त्याने सरळ दोन सेटमध्ये 7-5, 6-3 अशा फरकाने सामना जिंकला. त्याने अवघ्या एक तास 29 मिनिटांत लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन मरेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. विम्बल्डनच्या फायनलनंतर प्रथमच हे दोघे समोरासमोर आले होते. दुसर्‍या मानांकित योकोविकला पहिल्या सेटवर मरेने चांगलेच झुंजवले. मात्र, ट्रायब्रेकरमध्ये रंगलेला सेट सर्बियाच्या खेळाडूने आपल्या नावे केला. त्यापाठोपाठ त्याने दुसर्‍या सेटमध्येही बाजी मारून उपांत्यपूर्व सामना आपल्या नावे केला.

निशिकोरीचा सनसनाटी विजय
जपानच्या केई निशिकोरीने पुरुष एकेरीच्या अंतिम आठमध्ये सनसनाटी विजय मिळवला. त्याने 17 वेळचा ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररला पराभूत केले. निशिकोरीने 3-6, 7-5, 6-4 अशा फरकाने सामना जिंकला.निशिकोरीला विजयासाठी तब्बल दोन तास झुंज द्यावी लागली.

ली ना, सिबुलकोवाची आगेकूच
जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेली ली ना आणि ऑस्ट्रेलियन ओपनची उपविजेती डोमिनिका सिबुलकोवाने महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. चीनच्या ली नाने 11 व्या मानांकित कॅरोलीन वोज्नियाकीचा 7-5, 7-5 अशा फरकाने पराभव केला. तसेच सिबुलकोवाने तिसर्‍या मानांकित अग्निजस्का रंदावास्कावर 3-6, 7-6, 6-3 अशा फरकाने मात केली. रंदावास्काने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली होती. मात्र, तिला दुसर्‍या व तिसर्‍या सेटमध्ये सिबुलकोवाला रोखता आले नाही.