आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - सहा वेळेसचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडरर आणि पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचणारा इंग्लंडचा अँडी मुरे यांच्यात रविवारी पुरुष एकेरीचा अंतिम सामना होईल. गेल्या 74 वर्षांत फायनलमध्ये पोहोचणारा मुरे इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. दोन्ही स्टार खेळाडूंत जोरदार संघर्ष होण्याची आशा आहे. दोघांकडेही इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
तुफानी फॉर्मात असलेला विक्रमी 16 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि इंग्लंडच्या अँडी मुरे हे दोघे रविवारी एकूण एक कोटी साठ डॉलर इतकी बक्षीस रक्कम जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील.
फेडरर-मुरे समोरासमोर
तिसर्यांदा ग्रँडस्लॅम फायनल - फेडरर आणि मुरे यांच्यात हा तिसरा ग्रँडस्लॅम फायनल असेल. यापूर्वी दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपन 2010, यूएस ओपन 2008 च्या फायनलमध्ये आले होते. दोन्ही वेळा फेडरर जिंकला.
आमनेसामने
एकूण 15 सामने, 08 वेळा फेडरर, तर 07 वेळा मुरे विजयी.
फेडररचा अखेरचा ग्रँडस्लॅम फायनल विजय : ऑस्ट्रेलियन ओपन 2010.
पेस-वेस्निना मिर्श दुहेरीच्या फायनलमध्ये
भारताचा स्टार खेळाडू लिएंडर पेस आणि रशियाच्या एलिना वेस्निना यांनी मिर्श दुहेरीच्या फायनलमध्ये धडक दिली. चौथ्या मानांकित पेस आणि वेस्निना यांनी अव्वल मानांकित अमेरिकन जोडी बॉब ब्रायन आणि लिझेल ह्यूबर यांना 7-5, 3-6, 6-3 ने पराभूत करून फायनलमध्ये थाटात प्रवेश केला. भारत आणि रशियन जोडीने एक तास आणि 48 मिनिटांत विजय मिळवला. पेस आणि वेस्निना यांनी एका वर्षात दुसर्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, बेथानी माटेक-सँडस् होरिया टेकूकडून पराभूत झाल्यानंतर त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता विम्बल्डनमध्ये पेस-वेस्निना जोडीला किताब पटकावण्याची चांगली संधी आहे. पहिला सेट रोमांचक झाला. टायब्रेकरमध्ये गेलेल्या या सेटमध्ये पेस-वेस्निना यांनी बाजी मारली. दुसरा सेट अमेरिकन जोडीने जिंकला. तिसर्या निर्णायक सेटमध्ये भारत-रशियन जोडीने विजय मिळवला.
सेरेनाच राणी; पाचव्यांदा विम्बल्डनचा किताब
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.