आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्वल दहा श्रीमंत टेनिसपटूंत फेडरर नंबर वन !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगातील माजी नंबर वन रॉजर फेडरर हा सर्वाधिक श्रीमंत टेनिसपटू आहे. अव्वल दहा श्रीमंत टेनिसपटूंमध्ये रशियाची मारिया शारापोवासह पाच महिला खेळाडूंचा समावेश आहे. सर्वाधिक श्रीमंतांमध्ये शारापोवा तिस-या आणि सेरेना विल्यम्स चौथ्या स्थानावर आहे.


वेल्थ एक्सच्या मते, स्वीसचा रॉजर फेडरर 180 मिलियन डॉलरसह श्रीमंताच्या यादीत अव्वलस्थानी आहे. विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत पराभूत झालेला स्पेनचा राफेल नदाल दुस-या स्थानावर आहे. त्याची संपत्ती 120 मिलियन डॉलर एवढी आहे. तीन ते पाचव्या स्थानावर महिला खेळाडू विराजमान आहेत. यामध्ये 95 मिलियन डॉलरसह शारापोवा तिस-या आणि 90 मिलियन डॉलरसह सेरेना चौथ्या स्थानावर आहे. अमेरिकेची व्हिनस विल्यम्सची कमाई 60 मिलियन डॉलर आहे. यासह तिने पाचवे स्थान गाठले. जगातील नंबर वन नोवाक योकोविक श्रीमंताच्या यादीत सहाव्या स्थानी आहे. त्याची संपत्ती 55 मिलियन डॉलर आहे. अ‍ॅँडी मुरे 42 मिलियन डॉलरसह सातव्या स्थानावर आहे.


जगातील श्रीमंत खेळाडू
क्र. खेळाडू संपत्ती
1. रॉजर फेडरर 180
2. राफेल नदाल 120
3. मारिया शारापोवा 95
4. सेरेना विल्यम्स 90
5. व्हीनस विल्यम्स 60
6. नोवाक योकोविक 55
7. अ‍ॅँडी मुरे 42
8. ली ना 35
9. हेविट 30
10. कॅरोलीन वोज्नियाकी 30
आकडे मिलियन डॉलरमध्ये