आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धा : फेडरर शांघायचा चॅम्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय - तब्बल १७ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर रविवारी शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या जाइल्स सिमोनचा पराभव केला. या वेळी स्विसकिंग फेडररने ७-६, ७-६ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. त्याने उपांत्य लढतीत जगातील नंबर वन नोवाक योकोविकवर धक्कादायक विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती. तसेच अनेक दिग्गजांना धूळ चारून फ्रान्सच्या बिगरमानांकित सिमोनने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या वेळी त्याने अंतिम लढतीत दिलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दमदार सुरुवात करणा-या फेडररला फ्रान्सच्या सिमानने तोडीस तोड खेळी करून पहिल्या सेटमध्ये प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला गेला. मात्र, स्विसच्या फेडररने आक्रमक सर्व्हिस करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारून आघाडी मिळवली. त्यानंतर दुस-या सेटमध्येही सिमोनने फेडररला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने केलेला प्रयत्न अपयशी राहिला. फेडररने दुसरा सेटही जिंकून किताबावर नाव कोरले.
दुसरीकडे अमेरिकेच्या बॉब आणि माइक या ब्रायन बंधूंनी पुरुष दुहेरीचा किताब पटकावला. या जोडीने अंतिम लढतीत ज्युलियन बेनातून आणि एडवर्ड रॉजरला ६-२ ७-६ ने हरवले.

जपान ओपन स्टोसूरकडे
ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने जपान ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने कझाकिस्तानच्या झरिना दियासचा पराभव केला. अव्वल मानांकित स्टोसूरने ७-६,. ६-३ ने अंतिम सामना जिकंला. यासह तिने डब्ल्यूटीएचे विजेतेपद आपल्या नावे केले. २०११ यूएस ओपनची विजेती स्टोसूरला पहिल्या सेटमध्ये शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, दुस-या सेटमध्ये तिने सहज विजय मिळवला. पराभवामुळे जागतिक क्रमवारीत ३७ व्या स्थानावर असलेल्या दियासला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले