आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडररला इस्तंबूल अाेपनचे विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल - स्विस किंग राॅजर फेडरर इस्तंबूल अाेपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब अापल्या नावे केला. अव्वल मानांकित फेडररने अंतिम सामन्यात उरुग्वेच्या पाब्लाे कुइवेसचा पराभव केला. त्याने ६-३, ७-६ अशा फरकाने विजय मिळवला. यासह त्याने ८५ व्या विजेतेपदावर नाव काेरले.

अागामी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फेडररचे हे अजिंक्यपद महत्त्वाचे मानले जात अाहे. येत्या २४ मेपासून फ्रेंच अाेपनला प्रारंभ हाेत अाहे. त्यासाठी अापण पूर्णपणे सज्ज असल्याचे संकेत फेडररने किताब जिंकून दिले अाहेत.

९६ मिनिटांची झुंज
इस्तंबूल अाेपन टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी फेडरर अाणि पाब्लाे यांच्यात तब्बल एक तास ३६ मिनिटांची झुंज रंगली. यात सरस खेळी करून अव्वल मानांकित फेडररने बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारणा-या स्विसच्या खेळाडूला पाब्लाेने दुस-या सेटमध्ये चांगलेच झुंजवले. त्याने ताेडीस ताेड खेळी करून जाेरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला गेला. अखेर फेडररने अाक्रमक सर्व्हिस करताना दुसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.

सेरेनाची अागेकूच, व्हीनस बाहेर
जगातील नंबर वन सेरेनाने माद्रिद अाेपन टेनिस स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. मात्र, माजी नंबर वन व्हीनसला पहिल्याच फेरीत पराभवाला सामाेरे जावे लागले. सेरेनाने अापली सहकारी मेडिसन ब्रेगलेचा पराभव केला. तिने ६-०, ६-१ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह तिने दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे महिला एकेरीच्या सलामी सामन्यात बेलारुसच्या व्हिक्टाेरिया अझारेंकाने जगातील माजी नंबर वन व्हीनसला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. तिने ६-३, ७-५ अशा सामना जिंकून दुस-या फेरीत धडक मारली.