आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन ग्रांप्री : फर्नांडो अलोन्सो दुसर्‍यांदा चॅम्पियन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय - स्पेनचा फर्नांडो अलोन्सोने रविवारी चीन ग्रांप्री फॉर्म्युला वन रेस जिंकली. त्याचा संघ फेरारीचा हा यंदाच्या सत्रातील पहिला विजय ठरला. अलोन्सोने दुसर्‍यांदा ही रेस आपल्या नावे केली.

31 वर्षीय अलोन्सोने शांघाय इंटरनॅशनल सर्किटवर तिसर्‍या स्थानावरून स्पर्धेला सुरुवात केली. त्याने 305.066 किमीची रेस एक तास 36 मिनिट 26:945 सेकंदात पूर्ण केली आणि अव्वलस्थान गाठले. गत वर्षी जुलैमध्ये त्याने ही स्पर्धा जिंकली होती. त्याची ही करिअरमधील 31 वी ट्रॉफी ठरली. या स्पर्धेत सेबेस्टियन वेटलने चौथ्या स्थानावर धडक मारली.