आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरर, शारापोवा तिस-या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - दुसरी मानांकित रशियाची मारिया शारापोवा आणि पुरुष गटात चौथा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. टॉमस बर्डिच, एग्निजस्का रंदवास्का यांनीसुद्धा विजयी अभियान कायम ठेवले.

महिला गटात मारिया शारापोवाने बिगर मानांकित जपानच्या मिसाकी दोईला सरळ सेटमध्ये 6-0, 6-0 ने हरवले. महिला गटातील इतर एका लढतीत ए. रंदवास्काने रोमानियाच्या एरिना कॅमेलिया बेगुला 6-3, 6-3 ने तर पाचवी मानांकित कर्बरने चेक गणराज्यच्या लुसी रेदेकाला 6-3, 6-1 ने मात दिली. याशिवाय सहावी मानांकित चीनच्या ली नाने बेलारुसच्या ओग्ला गोवोरत्सोवाला 6-2, 7-5 ने हरवले. अकरावी मानांकित फ्रान्सची मरियन बार्तोली यांनी सुद्धा तिस-या फेरीत प्रवेश केला. सर्बियाच्या अ‍ॅना इवानोविचने तैवानच्या चॉन यांग जानला 7-5, 6-1, 6-4 ने हरवत तिसरी फेरी गाठली.

संघर्षपूर्ण लढतीत फेरर विजयी
पुरुष गटातील दुस-या फेरीत अमेरिकेच्या टीम स्मिजेकविरुद्ध डेव्हिड फेररला विजयासाठी संघर्ष करावा लागला. फेररने 6-0, 7-5, 4-6,, 6-3 ने विजय मिळवला. पुरुष गटात चेक गणराज्यच्या टॉस बर्डिचने फ्रान्सच्या गुलियुमे रुफिनला 6-2, 6-2, 6-4 ने हरवले.

भूपती-नेस्टर दुस-या फेरीत; सोमदेव, सानिया पराभूत
भारताच्या महेश भूपतीने आपला कॅनडाचा जोडीदार डॅनियल नेस्टरसोबत पुरुष दुहेरीत विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. मात्र, पुरुष एकेरीत भारताचा सोमदेव देववर्मन आणि महिला दुहेरीत सानिया मिर्झाला पराभवाचा सामना करावा लागला. भूपती-नेस्टर या पाचव्या मानांकित जोडीने बिगर मानांकित स्पेनचा पोबलो एंदुजर आणि गुइलिर्मो गार्सिया लोपेझ या जोडीला सरळ सेटमध्ये 6-2, 6-4 ने पराभूत करून जोरदार सुरुवात केली. मात्र, सोमदेवला 24 वा मानांकित पोलंडच्या जर्जी जेनोविजने पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 7-6, 6-3, 1-6, 0-6, 5-6 ने हरवले. महिला दुहेरीत दहावी मानांकित जोडी भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार अमेरिकेच्या बेथानी माटेक यांचा पराभव झाला.

दोन धक्कादायक पराभव
महिला गटात ऑ स्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरला चीनच्या झेंग जी आणि 15 वी मानांकित स्लोवाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोवाला रशियाच्या बालेरिया सर्विकने पराभूत केले. स्टोसूरला झेंग जीने 6-4, 1-6, 7-5 ने हरवले तर वालेरिया सार्विकने सिबुलकोवाला 7-6, 6-4 ने मात दिली.