आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fielding Coach Grant Luden Quits Over Players’ Attitude

WC: भारतासोबत पराभूत झाल्‍याने पाकिस्‍तानी खेळाडूंची प्रशिक्षकांना शिवीगाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - कट्टर प्रतिस्‍पर्धी भारतासोबत पाकिस्‍तान संघ पराभूत झाल्‍याने संघातील खेळाडूंनी प्रशिक्षकांना शिवीगाळ केल्‍याचे वृत्‍त आहे. संघातील वरीष्‍ठ खेळाडू शाहिद आफ्रीदी, अहमद शहजाद आणि उमर अकमल यांनी पाकिस्‍तानचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रांट लुडेन यांना शिवीगाळ केली. भलेही पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) याची पुष्‍टी केली नाही.
(फोटो - ग्रांट लुडेन)

अॅडिलेड येथे दि. 15 फेब्रुवारी रोजी झालेल्‍या भारत पाक लढतीमध्‍ये पाकिस्‍तानचा दारुण पराभव झाला. माध्‍यमं आणि माजी खेळाडूंनी पाकिस्‍तान संघावर आगपाखड केली. त्‍यामुळे चिडलेल्‍या शाहिद आफ्रीदी, अहमद शहजाद आणि उमर अकमल यांनी प्रशिक्षकांसोबत चांगली वर्तणूक केली नाही. त्‍यांना शिवीगाळ केली.
राजीनामा देणार - प्रशिक्षकांनी धमकी
लुडेन यांनी पीसीबीच्‍या अध्‍यक्षांना पत्र लिहून राजीनामा देणार असल्‍याची धमकी दिली. खेळाडूंचे आपल्‍यासोबतचे अपमानास्‍पद वर्तन आपणास मान्‍य नाही. असे त्‍यांनी पत्रात म्‍हटले आहे.
पत्र मिळताच पीसीबीचे अध्‍यक्ष शहरयार खान यांनी संघ व्‍यवस्‍थापक नावेद चीमा, मुख्य प्रशिक्ष्‍ाक वकार युनूस आणि लुडेन यांच्‍यासोबत चर्चा केली आहे.अशी सुत्रांनी माहिती दिली.
मे 2014 मध्‍ये पाकिस्‍तानसोबत करारबध्‍द
लुडेन यांना क्षेत्ररक्षाणाचे प्रशिक्षक म्‍हणून पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी मे 2014 मध्‍ये नियुक्‍त केले होते. लुडेन यापूर्वी बांगलादेशचे प्रशिक्षक होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मिस्‍बाहविषयी सुरु आहे कटकारस्‍थान