आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्राझीलचा सामना म्हणजे मज्जाच मजा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - आज राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझील व चिलीचा सामना आहे. याचाच अर्थ येथील चाहत्याला स्वत:च्या पाकिटातून न खाण्यासाठी खर्च करायचा आहे, न पिण्यासाठी. जवळपास प्रत्येक हॉटेल किंवा हॉस्टेलमध्ये या सामन्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. खूप मोठे केक तयार होत आहेत. खूप सारी फुले, बिस्किटे, पॉपकॉर्नही. वेगवेगळ्या प्रकारची दारू आणि बिअरचा तर खजिनाच आहे. जोरदार संगीत आणि खूप सारी मजा. तुम्ही येथे ज्या हॉटेलात थांबले आहात, त्या हॉटेलच्या मालकाकडून ही सर्व व्यवस्था आहे. अमुक अमुक दिवशी सामना पाहण्यासाठी यायचे असल्याचे निमंत्रण एक दिवस आधीच सर्वांना धाडण्यात येतात. उशिरा येणार्‍यांना कुठेही स्थान नाही. जो पूर्ण वेळ थांबेल, तोच पूर्ण मजा करेल.
हॉटेलच्या स्टाफशी बोलल्यानंतर लक्षात आले की, येथे असे होत असते. ब्राझीलचा कोणताही सामना असो, तो पाहण्याची पद्धत हीच आहे. सामन्याच्या वेळी मालक आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत पूर्ण वेळ उपस्थित असतात. हॉटेलात येताच खाण्यापिण्याला सुरुवात होते असे नाही. येथे या, आपल्या जागा निवडून बसा. सामन्याचा पूर्ण आनंद लुटा आणि ब्राझीलचा विजय झाला, तर मग रात्री झोपायचेसुद्धा असते, हे विसरूनच जा. हे रात्र जागरण सकाळपर्यंत सुरू असते. आपल्यासारखी माणसे एकेक रुपया विचार करून खर्च करतात, अशांसाठी तर ही मेजवाणीच असते. सामनासुद्धा बघितला आणि फुकटात खाणेपिणेही झाले. जेथे पाणी पिण्यासाठी शंभर रुपये खर्च करावे लागतात, तेथे अशा प्रकारे पोटभर जेवण आणि मदिरा मोफत असेल, तर मग काय.. मजाच.
ब्राझील जिंकला तर हा सर्व गोंधळ सुरू असतो. चुकून पराभव झाला तर मग काय? मी हा प्रश्न हॉटेलच्या रिसेप्शनिस्टला विचारला. ती म्हणाली, ब्राझील जिंकण्यासाठी प्रार्थना करा. चुकून पराभव झाला, तर सर्व मेजवाणी बंद व हे सर्व जण घरी जाऊन मुकाट्याने झोपतील. सर्व काही खाणेपिणे जागच्या जागी राहील. तुम्ही येथील वातावरण विचारत आहात, आमच्याकडे तर घरीसुद्धा असाच गोंधळ, असेच वातावरण असते. पराभवाचे दु:ख इतके असते की आम्ही खायचे प्यायचे सोडून देतो.

ब्राझीलचा विजय आपल्या स्वार्थाचा नसला, तरीही लज्जतदार जेवणासाठी तर निश्चित हात उचलून प्रार्थना करू शकतो. ब्राझीलचा विजय व्हावा. आतापर्यंत तर ही प्रार्थना खरी ठरली आहे. भीती इतकी आहे की, चुकून एखाद वेळेस ब्राझीलचा पराभव झाला, तर हॉटेलात नसले तरीही किमान बाहेर तरी जेवण मिळेल की नाही! ब्राझीलने वर्ल्डकप जिंकला, तर त्या यशात आमची प्रार्थनाही गणली जावी.