आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार अनुभवा, पण ‘व्हायरस’चा ‘गोल’ होऊ देऊ नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी फुटबॉलप्रेमी आता सज्ज झाले आहेत, परंतु या फुटबॉलप्रेमींना बळी कसे पाडता येईल याचा विचार ‘मॅलवेअर’ सध्या करीत आहेत. घोटाळेखोर नव्या दमाने हल्ला चढवण्यासाठी सुसज्ज होत असल्याबद्दल अँँटिव्हायरस क्षेत्रातील क्विकहिल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या आघाडीच्या कंपनीने सतर्कतेचा संदेश दिला आहे.

ब्राझीलला जाणारे फुटबॉल चाहते तसेच ऑनलाइन तिकिटे, हॉटेल आरक्षण व अन्य माहिती हवे असलेले चाहते हे या हल्लेखोरांचे प्रमुख लक्ष्य असल्याचे जय काटकर यांनी म्हटले आहे. त्यासाठी बाजारात असलेल्या विविध प्रलोभनांना बळी न पडता खबरदारी राखण्याचे आवाहन केले आहे.

फुटबॉल विश्वचषकच्या निमित्ताने होणारे प्रोत्साहनपर कार्यक्रम, बनावट मोफत तिकिटे तसेच अन्य बनावट सवलतीच्या माध्यमातून हल्लेखोर घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात. तसेच मोफत तिकीट असलेल्या वा तिकिटाची अँटॅचमेंट असलेल्या वेबसाइटच्या लिंक समाविष्ट असलेले ई-मेल चाहत्यांना येतात. त्या लिंकवर क्लिक केल्याने युजरना फिशिंग वेबसाइटवर नेले जाते वा युजरच्या कॉम्प्युटरमध्ये मॅलवेअर इन्फेक्शन आणणार्‍या वेबसाइटकडे नेले जाते. कोणतीही अँटॅचमेंट डाउनलोड केल्यास घोटाळेखोरांचे काम सोपे होते याकडे काटकर यांनी लक्ष वेधले.

अनेक फिशिंग वेबसाइट्सनी अगदी व्यावसायिक आणि कायदेशीर दिसतील अशी संकेतस्थळे अगोदरच दाखल केली असून साधारण वापरकर्त्यांना मूळ संकेतस्थळापासून या बनावट संकेतस्थळ ओळखणे कठीण असते. त्यामुळे सुरक्षित आणि कायदेशीर साइट असल्याचे समजून त्या साइटवर जाणे धोक्याचे ठरू शकते. त्यापेक्षा सावध राहिल्यास फुटबॉल चषकाच्या दरम्यान, कोणत्याही घोटाळ्यापासून चांगल्या प्रकारे संरक्षण करून घेता येईल, असेही ते म्हणाले.

या आहेत टिप्स
> विश्वचषक फुटबॉलबाबत येणार्‍या प्रत्येक ई-मेलकडे विशेषकरून सवलती, बक्षिसे, लॉटरी व तिकिटे देणार्‍यांबाबत सावध राहा.
>केवळ www.fifa.com या अधिकृत वेबसाइटवर तिकिटे मिळू शकतील.
> ही सेवा देण्याचा दावा करणार्‍या अन्य वेबसाइटवर विश्वास ठेवू नये.