आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफाने मागितली ब्राझीलची माफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ दी जानेरिओ - फुटबॉल विश्वचषकासाठीच्या जाहिरातींमध्ये ब्राझीलच्या स्थानिक चालीरीती आणि तेथील लोकजीवनाची थट्टा करण्यात आल्याचा समज झाला असल्यास ‘फिफा’च्या वतीने माफी मागण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

ब्राझीलमध्ये फुटबॉलप्रेमींसाठी फिफाने दहा सल्ले जाहीर केले. यात देशाची थट्टा करण्यात आल्याची जनभावना निर्माण झाली होती. तसेच क्रीडाविश्वातील कंपनी आदिदासने टी-शर्ट बाजारात आणले होते. त्या टी शर्टवर ब्राझील हा सर्वाधिक मादक, वक्तशीर नसलेला, उतावीळ आणि गबाळ्यांचा देश असल्याचे म्हटले होते. फुटबॉल विश्वचषक अगदी तोंडावर आला असूनही आणि निर्धारित तारीख उलटूनही स्टेडियमची कामेच पूर्णत्वाला गेलेली नाहीत.