आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलचा कुंभमेळा: गतविजेता स्पेन, ब्राझील ‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये सामील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ- वर्ल्डकप फुटबॉल 2014 साठी 32 संघांच्या सोडती जाहीर करण्यात आल्या आहेत. कोस्टा डी सोपी बहिया स्टेट येथे आयोजित एका रंगारंग कार्याक्रमात फुटबॉलचा महान खेळाडू झिनेदीन झिदानच्या उपस्थितीत या सोडती जाहीर करण्यात आल्या. गतविजेता स्पेन आणि ब्राझील अनुक्रमे ए व बी गटात असून, हे दोन्ही गट ग्रुप ऑफ डेथ असल्याचे मानले जात आहे.
ब्राझीलचा पहिला सामना 21 जून रोजी क्रोएशियासोबत साओ पाओलो येथे होईल. बी गटात विश्वविजेता स्पेनची पहिली लढत 13 जून रोजी हॉलंडशी होईल. उरुग्वेचा पहिला सामना 14 जून रोजी कोस्टारिकासोबत असेल. इंग्लंड 15 जून रोजी इटलीविरुद्ध लढतीने अभियानाला सुरुवात करेल.
> वर्ल्डकप फायनल 13 जुलै, 2014. स्थळ : रिओ दी जानेरिओ
> उपांत्य सामने 8 आणि 9 जुलै 2014.
> उपांत्यपूर्व फेरीचे सामने 4 आणि 5 जुलै रोजी होतील.
सोडती काढताना माजी खेळाडू झिनेदीन झिदान आणि काफू.
अज्रेंटिना एफ गटात
कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या लियोनेल मेसीच्या अज्रेंटिना संघाला एफ गटात स्थान मिळाले. अज्रेंटिनाचा पहिला सामना 15 जून रोजी बोस्निया हज्रेगोविनासोबत होईल. ही लढत रिओ दी जनेरिओ येथे रंगेल.
> तिसर्‍या स्थानासाठी लढत 12 जुलै, ब्रासिला.
> उपांत्यपूर्व फेरीचे सामने 4 आणि 5 जुलै रोजी होतील.
> स्पध्रेतील बाद फेरीच्या सामन्यांना 28 जूनपासून सुरुवात होईल.
गटनिहाय सोडती खालीलप्रमाणे
ए गट : ब्राझील, क्रोएशिया, मेक्सिको, कॅमरून.
बी गट : स्पेन, चिली, ऑस्ट्रेलिया, हॉलंड.
सी गट : कोलंबिया, ग्रीस, कोट डी आयवरी, जपान.
डी गट : उरुग्वे, कोस्टारिका, इंग्लंड, इटली.
ई गट : स्वित्झर्लंड, इक्वेडोर, फ्रान्स, होंडुरास.
एफ गट : अज्रेंटिना, बोस्निया हज्रेगोविना, इराण, नायजेरिया.
जी गट : र्जमनी, पोतरुगाल, घाना, अमेरिका.
एच गट : बेल्यिजम, अल्जेरिया, रशिया, कोरिया गणराज्य.