आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी’ फुटबॉल चॅम्पियन्सवर होणार बक्षिसांचा वर्षाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला लवकरच सुरुवात होत आहे. तब्बल महिनाभर रंगणार्‍या या वर्ल्डकपमुळे प्रत्येक फुटबॉल चाहत्याच्या आनंदाला पारावर राहणार नाही. यात कधी आपल्या आवडत्या टीमच्या विजयाचा जल्लोष असेल, तर कधी पराभवामुळे निराशेचे वातावरण राहील. सामन्यापूर्वीच विजयाचेही अंदाज लावले जातील. आवडत्या टीमच्या विजयाचे दावे केले जातील. तसेच विरोधी टीमच्या पराभवासाठी प्रार्थना केली जाईल.

विश्वचषकातील हा जल्लोष द्विगुणित करण्यासाठी आता दैनिक ‘दिव्य मराठी’ घेऊन येत आहे दैनिक ‘दिव्य मराठी’ फुटबॉल चॅम्पियनशिप काँटेस्ट. या डेली काँटेस्टमध्ये त्या दिवशी होणार्‍या सामन्यातील निकालाची रोज भविष्यवाणी केली जाईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दवडू नका.

बंपर प्राइज
दैनिक ‘दिव्य मराठी’ फुटबॉल चॅम्पियन काँटेस्टमध्ये सहभागी होऊन बंपर प्राइजदेखील जिंकता येणार आहे. पूर्ण वर्ल्डकपदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची सर्वाधिक योग्य उत्तरे देणारे स्पर्धेक बंपर प्राइजचे हक्कदार होतील. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्यांची निवड केली जाईल. त्यामुळे यासाठी सज्ज व्हा आणि उद्यापासून दैनिक ‘दिव्य मराठी’मध्ये विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे देऊन दैनिक ‘दिव्य मराठी’ फुटबॉल चॅम्पियन व्हा.