आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA WC : Brazil Will Win Latest News In Marathi

ब्राझील विश्वविजेता; पेलेची भविष्यवाणी! जर्मनी-ब्राझील फायनलचेही भाकीत वर्तवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - यंदाचा वर्ल्डकप यजमान ब्राझील संघ जिंकणार असल्याची भविष्यवाणी महान फुटबॉलपटू पेलेने केली. यासह यजमान संघाचा विश्वविजेता होण्याचा दावा आता अधिकच मजबूत झाला आहे. गत आठवड्यात फुटबॉल विश्वातील काही तज्ज्ञांनीदेखील ब्राझीलच किताब जिंकणार असल्याचा दावा केला आहे. आता त्यापाठोपाठ पेलेने केलेल्या या भविष्यवाणीने यजमान टीमच्या खेळाडूंचाही आत्मविश्वास द्विगुणित झाला. तसेच घरच्या मैदानावर चमत्कारिक कामगिरी करण्याचा विश्वासही खेळाडूंनी वर्तवला.
वर्ल्डकपची फायनल ब्राझील आणि जर्मनी यांच्यात होईल, असेही पेले म्हणाले. मात्र, जर्मनीसाठी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अधिकच खडतर असल्याचेही भाकीत त्यांनी वर्तवले. या वाटेवर जर्मनीला बलाढ्य स्पेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विश्वविजेता होण्यासाठी यजमान संघाने मागील दोन वर्षांपासून कसून तयारी सुरू केली आहे. याच मेहनतीचे फळ खेळाडूंना निश्चितपणे मिळेल, असेही या वेळी पेले म्हणाले.
1966 मध्ये इंग्लंडने भूषवले यजमानपद
16 टीमचा होता सहभाग
11 ते 30 जुलैदरम्यान रंगलेसामने
इंग्लंड विजेता, जर्मनीला उपविजेतेपद