आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेसमुळे स्पेन अडचणीत, कोच विसेंट चिंताग्रस्त; यंदा प्रथमच सहा कॅमरे असलेला चेंडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलोना - गतविजेत्या स्पेनसमोर विश्वचषकावरचे वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. या टीमला यंदा दावेदार मानले जात आहे. मात्र, वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच फिटनेसमुळे सध्या स्पेन अडचणीत आहे. फिटनेस हाच सध्या स्पेनचा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे हे आव्हान पेलल्यानंतरच स्पेनला दावेदारीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवता येणार आहे. यंदा प्रथम सहा कॅमेरे असलेल्या चेंडूचा वापर सामन्यात होईल.
‘आमच्या संघातील अनेक खेळाडू वर्षभरापासून खेळत आहे. या सर्वांना वर्ल्डकपपूर्वी कोणत्याही प्रकारची विर्शांती मिळाली नाही. त्यामुळे हे सर्व खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले आहेत. तसेच यामुळेच हे खेळाडू आपला फिटनेस टिकवून ठेवू शकले नाहीत. मात्र, हे सर्व खेळाडू वर्ल्डकपपूर्वी आपला फिटनेस चांगला ठेवतील,’असा विश्वास स्पेन टीमचे कोच विसेंट डेल बॉस्क यांनी व्यक्त केला आहे.

पुनरागमनासाठी टोरेस उत्साहित
फर्नांडो टोरेस स्पॅनिश टीममध्ये निवड झाल्याने सध्या फारच खुश आहे. गत काही दिवसांपासून दुखापतीमुळे तो चांगलाच त्रस्त होता. त्यामुळे त्याचे वर्ल्डकप खेळणे, जवळजवळ अनिश्चितच होते. याच दरम्यान, विसेंट यांनी स्पेन टीम जाहीर केली. या टीममध्ये टोरेसेलाही संधी देण्यात आली. ‘शेवटची कोच विसेंट यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला आहे. त्यामुळे माझ्या आत्मविश्वास अधिक दुणावला आहे. हाच विश्वास सार्थकी लावण्याचा माझा अधिक प्रयत्न असेल. तसेच टीमकडून सर्वाेत्कृष्ट कामगिरी करण्याचे माझे लक्ष्य आहे,’ असे टोरेस म्हणाला.