आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्ये यंदाच्या वर्ल्डकपचे रंगारंग आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओ पाउलो - अवघ्या जगाची नजर विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे आयोजन करणार्‍या ब्राझीलवर आहे. मात्र, 64 वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्डकपचे आयोजन करणार्‍या ब्राझीलचे स्वरूप या वेळी पूर्णपणे बदलले आहे. यंदाच्या वर्षी 12 शहरांतील स्टेडियमवर सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर एकूण 12.32 अब्ज डॉलरचा खर्च करण्यात येणार आहे. ‘1950 द प्राइस ऑफ द वर्ल्डकप’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकात ब्राझीलमध्ये विश्वचषकाच्या आयोजनासंबंधीच्या गमतीदार पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकातील माहितीनुसार 1950 च्या वर्ल्डकपचे सामने सहाच मैदानांवर खेळवले गेले होते. यात 430 मिलियन रियालमध्ये दोन वर्षांत मारकाना स्टेडियम उभे करण्यात आले होते. स्पर्धेच्या 90 पेक्षा अधिक टक्के पैसा हा एकाच स्टेडियमवर खर्च करण्यात आला होता.

ब्राझील-अज्रेंटिनामध्ये रंगणार फायनल : स्कॉलरी
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये यजमान ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यात अंतिम सामना होईल, अशी भविष्यवाणी ब्राझील संघाचे प्रशिक्षक लुईज फेलिप स्कॉलरी यांनी केली. स्पर्धेतील विश्लेषणानंतरही आपण हा अंदाज बांधला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या 13 जुलै रोजी दक्षिण अमेरिकेच्या देशांमध्ये वर्ल्डकपच्या फायनलचा मुकाबला रंगणार आहे, असे अनुमानही स्कॉलरी यांनी काढला. ‘आम्ही काढलेल्या अंदाजानुसार फायनलच्या मैदानावर एकीकडे ब्राझील आणि दुसर्‍या बाजूला अज्रेंटिना राहील,’ असेही स्कॉलरी म्हणाले. मात्र, या सामन्यातील निकालाबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारचे अंदाज स्पष्ट केले नाहीत. ब्राझील आणि अर्जेंटिना हे संघ चार वेळा वर्ल्डकपमध्ये समोरासमोर आले आहेत.

यंदा सर्वकाही वेगळे असेल
यंदाच्या वर्ल्डकपसाठी 30 लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. तसेच सामने पाहण्यासाठी विदेशातून तब्बल आठ लाख चाहते येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यंदाच्या स्पर्धेचे स्वरूप हे अधिकच व्यापक आहे. 1950 मध्ये केवळ 27 क्वालिफाइंग सामने आयोजित करण्यात आले होते. यंदाच्या स्पर्धेच्या तुलनेत यासाठी 800 पेक्षा अधिक सामने झाले आहेत. 1950 मधील स्पर्धेसाठी मुख्य आयोजक आणि थेट प्रक्षेपणाचीही व्यवस्था नव्हती. ज्युलिस रिमेंट ट्रॉफीला रिओ ज्वेलर्सच्या खिडकीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांना ही ट्रॉफी सहजासहजी पाहता येत होती. यंदा या विश्वचषकाला 267 दिवसांमध्ये 88 देशांतून प्रवास करण्याची संधी मिळाली. 1950 मध्ये ब्राझील संघ फायनलमध्ये उरुग्वेकडून पराभूत झाला होता.