लंडन- ब्राझिल येथे होत असलेल्या 'FIFA वर्ल्ड कप 2014' ची जय्यत तयारी सुरु आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 32 देश सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांना आतापासूनच या फुटबॉल स्पर्धांची झींग चढली आहे.
फुटबॉलचे नाव काढताच अनेकांना गोल, लिओनेल मेस्सी, मॅराडोना, ख्रिस्तयानो रोनाल्डो, पेनॉल्टी कॉर्नर आठवतात. परंतु अमेरिकेचा क्रीडा छायाचित्र पत्रकार 'टीम टेडर' याने एक नवीन कॅलेंडर प्रदर्शित केले आहे. त्याने ब्राझिलमधील अप्रतिम स्थळांचा वापर करुन सुंदर महिला फुटबॉल खेळतांना दाखविल्या आहेत.
टेडर हे उत्कृष्ठ क्रीडा छायाचित्रकार आहेत. त्यांनी काढलेली काही छायाचित्रे जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये वेळोवेळी प्रसिध्द झाली आहेत. त्यांनी मायकल पेल्प्स तसेच टॉम ब्रेडी यांच्यासोबत काम केले आहे.
या कॅलेंडरच्या निर्मितीसाठी टेडरने ब्राझिमधील शहरांमध्ये भ्रमंती केली. फुटबॉलच्या स्पर्धा जेथे खेळल्या जाणार आहेत, अशा सर्व मैदानांची तसेच शहरांची भ्रमंती केली. बेलम ते नताल, रियो दि जेनिरियो ते साऊ पाऊलो तसेच इतर बारा शहरांचा त्यांनी दौरा केला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, 'FIFA वर्ल्ड कप 2014' चे कॅलेंडर...