साओ पावलो- गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता कॉरिथिएंसचे मैदान खेळाडूंनी नव्हे, कलाकारांनी उजळून निघाले. या कलाकारांनी अफलातून सादरीकरण करत (ग्रीन थीम) पृथ्वी बचावचा संदेश प्रेक्षकांना दिला. विसाव्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला. 32 दिवस चालणाºया या स्पर्धेचा अंतिम सामना 13 जुलै रोजी होत आहे.
गतविजेता स्पेन आणि गत उपविजेता हॉलंड यांच्यात शुक्रवारी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसर्या सामन्यात वर्चस्व कायम ठेवण्यासाठी झुंज रंगणार आहे. शुक्रवारी होणारा हा सामना फायनलसारखाच रंगण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली. स्पेन संघ किताबावरचे वर्चस्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे, तर हॉलंड गत वर्ल्डकपच्या पराभवाची स्पेनला परतफेड करण्यासाठी सज्ज झाला आहे. फायनलमधील पराभवाचा बदला काढून यंदाच्या वर्ल्डकपमधील आपल्या मोहिमेला चांगली सुरुवात करण्याचा हॉलंडचा प्रयत्न असेल. त्यामुळे या दोन्ही टीमला कमी लेखून चालणार नाही. स्पेन व हॉलंड या दोन्ही टीमकडे जगातील स्टार मिडफील्डर आहेत. स्पेन टीममध्ये झावी, रामोस, इनिस्ता आणि डेव्हिड सिल्वा आहे. तसेच अर्जेन रॉबिन, रॉबिन वान पर्सी यांच्यामुळे हॉलंड संघाचे पारडे अधिक जड आहे.
पॉप सिंगर जेनिफर लोपेझ, क्लाउडीया, पीटबुल यांच्या कर्णमधुर गीतांवर कलाकारांनी केलेल्या बहारदार नृत्याविष्कारासह नयनरम्य आतषबाजी, लेझर शोच्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी ब्राझीलमध्ये 20 व्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला गुरुवारी रात्री 12 वाजता जल्लोषात सुरुवात झाली. हा नयनरम्य उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठय़ा संख्येने चाहत्यांची उपस्थित होती. या वेळी ग्रीन थीमवर 600 कलाकारांनी नृत्याविष्कार करून उपस्थित चाहत्यांची मने जिंकली. यासह स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जल्लोषात पार पडला.
विश्वचषक फुटबॉल 2 सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली उपस्थितांची मने, ग्रीन थीमवर
कलाकारांनी सादर केले नृत्याविष्कार वर्ल्डकपला रंगारंग कार्यक्रमांची किक
> सोहळ्यात सहभागी झालेले संयुक्त राष्ट्र महासंघाचे बान की मून, राष्ट्रपती डिल्मा व फिफाचे सॅप ब्लॅटर.
>उद्घाटन सोहळ्यादरम्यान स्पर्धेच्या सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टरने टेहळणी करताना ब्राझीलियन सैनिक.
सामन्याचे प्रक्षेपण रात्री 9.30 वा. सोनी सिक्सवर
मेक्सिको-कॅमरून समोरासमोर
स्पर्धेच्या ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलियाशी लढत
विजयाच्या आशेने उतरणार चिली
हॉलंड टीम फायनलच्या पराभवाची स्पेनला करणार परतफेड
स्पेन-हॉलंड वर्चस्वासाठी आज झुंजणार
विश्वचषक स्पध्रेच्या दुसर्या दिवशी चिली आणि ऑस्ट्रेलियादरम्यान लढत होईल. या सामन्यात चिलीचे पारडे जड असले तरी ऑस्ट्रेलियाने वेळीच मुसंडी मारली तर हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. यंदा मार्च महिन्यांत इक्वेडोरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3-0 ची आघाडी मिळवूनही 3-4 ने पराभव पत्करला होता. या दोन्ही संघांत यापूर्वी चार वेळा लढती झाल्या आहेत. त्यापैकी तीन सामन्यांत चिलीने विजय मिळवला तर एक सामना अनिर्णीत ठरला होता. चिलीचा स्ट्रायकर वार्गस, सांचेज आणि मिडफील्डर आरटुरो विदालकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. वार्गस आणि विदालने पात्रता फेरीत चिलीसाठी प्रत्येकी 5 गोल केले होते. त्यामुळे आता या सामन्यांकडे सर्वांची नजर लागली आहे. चिली संघ ऑस्ट्रेलियाला नमवून चत्मकारासह स्पर्धेला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या दुसर्या दिवशी मेक्सिको आणि कॅमरून यांच्यादरम्यान पहिली लढत होईल. ग्रुप एमधील हा पहिलाच सामना असेल. हा सामना जिंकून पुढच्या फेरीसाठी आपला दावा मजबूत करण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष राहणार आहे. मेक्सिको आणि कॅमरून विश्वचषक स्पध्रेत पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. 1993 मध्ये या दोन्ही संघांदरम्यान पहिल्यांदा एक मैत्रीपूर्ण लढत खेळली गेली होती. यात मेक्सिकोने 1-0 ने विजय मिळवला होता. आजपर्यंतचा इतिहास लक्षात घेतला तर मेक्सिकोचा संघ विश्वचषकात एकदाही कोणत्याही आफ्रिकन संघाविरुद्ध विजय मिळवू शकला नाही. दुसरीकडे, कॅमरूनच्या संघाला विश्वचषकात लागोपाठ चार वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांना इतिहास बदलवण्याची संधी आहे. ‘ए’ गटात या दोन्ही संघांव्यतिरिक्त ब्राझील व क्रोएशिया या संघांचाही समावेश आहे.
> 68 हजारांहून अधिक प्रेक्षक मैदानावर उपस्थित
>736 फुटबॉलपटू होणार सहभागी
>32 देशांचे संघ मैदानात
>64 सामने खेळले जातील 12 मैदानांत
>100 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला सोहळा
>600 कलाकारांनी सादर केल्या विविध कला
>830 अब्ज रुपये स्पर्धेवर होणार खर्च
या रंगलेल्या सोहळ्यात क्लाउडिया, जेनिफर लोपेझ आणि पीटबुलने ‘वुई आर वन, ओले ओला...’ हे स्पर्धेचे थीम साँग सादर केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रंगारंग सोहळ्याचे छायाचित्रे...