स्पोर्टस् डेस्क - फुटबॉलचा महाकुंभ फिफा वर्ल्डकप सुरु होण्यास आता केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. ब्राझीलमध्ये 32 संघ वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी भीडणार आहेत.
वर्ल्डकपच्या आयोजनाने खेळाडूंच्या गुणांना वाव आणि फॅन्सचे मनोरंजन तेवढे होत नाही तर, यामुळे विश्वचषकाचे आयोजन करणा-या देशाची प्रतिष्ठा देखील वाढते.
ब्राझीलमध्ये होत असलेली विश्वचषक स्पर्धा आतापर्यंतच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात महागडी असल्याचे मानले जात आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जगभरातून जवळपास 37 लाख फुटबॉल चाहाते येण्याची शक्यता आहे. त्यासाठी अब्जावधी रुपये खर्च केले गेले आहेत.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमीत्ताने इतरही अनेक गोष्टींना वाव मिळतो. त्याचीच माहिती आम्ही देत आहोत, यात वेश्याव्यवसाय देखील आहे.
प्रोस्टिट्यूशन इंडस्ट्रीची तयारी
ब्राझीलमध्ये वेश्याव्यवसायाला कायदशीर मान्यता आहे. येथील 10 लाखांहून अधिक लीगल प्रोस्टिट्यूट्स फिफा वर्ल्डकप पाहाण्यासाठी येणा-या 37 लाख पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीला लागल्या आहेत. ब्राझील हा मस्तीचा देश मानला जातो. विश्वचषकाच्या निमीत्ताने येथे लाखो लोक येणार आणि ते येथील कामक्रिडेचाही आनंद घेणार असल्याचे मानले जात आहे. फुटबॉल विश्वचषकाचे यजमान शहर बेलो हॉरिजॉन्टेच्या डाउटाऊन येथे 23 वेश्यालये आहेत. यांना जोनास या नावाने ओळखले जाते. येथाली सेक्स वर्कर स्ध्या इंग्रजीचे शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे परदेशी पाहुण्यांशी त्यांना संवाद साधता येईल आणि वर्ल्डकपच्या दरम्यान कमाई वाढवता येईल.
दरम्यान, येथील सरकारी अधिका-यांचीही या वेश्यालयांवर करडी नजर आहे. विशेषतः कमी वयाच्या सेक्स वर्कर्सवर.