जगभरातील जे संघ फिफा फुटबॉल विश्वचषकात खेळाणार आहे किंवा ज्यांना फुटबॉलच्या या महासंग्रामात खेळण्याची संधी मिळाली नाही त्याही देशांमध्ये फुटबॉलचा फिवर पाहायला मिळत आहे. भारत विश्वचषकात सहभागी नाही, मात्र कोलकाताच्या गल्लीबोळात फुटबॉल चाहते विश्वचषकाच्या रंगात रंगून गेलेले दिसतात. अनेकांनी विश्वचषकाचा हेअर कट केला आहे, तर हॉटेल आणि उपहारगृहांमध्ये फुटबॉल आणि विश्वचषकाच्या आकाराच्या मिठाई तयार केल्या जात आहेत.
आज आम्ही तुम्हाला फुटबॉल विश्वचषकासंबंधीच्या काही रोचक घटना आणि आकड्यांची माहिती देणार आहोत.
11 सेकंदात गोल
फिफा विश्वचषकात सर्वात कमी वेळात गोल करण्याचा विक्रम तुर्कस्थानच्या हाकन सुकूरच्या नावे आहे. त्याने 29 जून 2002 ला कोरियाच्या विरोधात केवळ 11 सेकंदात गोल केला होता.
फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात कमी वेळेतील गोल ठरला आहे. फुटबॉल चाहात्यांना विश्वास आहे, की नेमार तुर्कीच्या सुकूरचा 12 वर्षांपूर्वीचा विक्राम मोडून नवा विक्रम प्रस्थापित करेल.
पुढील स्लाइडला क्लिक करुन वाचा, फिफा विश्वचषकासंबंधीच्या रोचक घटना