आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA WORLD CUP 2014 : Footballers Wives And Girlfriends In Brazil

कोचच्या इच्छेविरुद्ध ब्राझीलमध्ये पोहोचत आहेत फुटबॉलर्सच्या पत्नी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझील मध्ये 12 जूनपासून फुटबॉलचा रणसंग्राम सुरू होणार आहे. त्यासाठी जगभरातील प्रेक्षकांसोबतच खेळाडूंच्या सेलेब्रीटी पत्नी आणि गर्लफ्रेंड्स ब्राझीलमध्ये पोहोचत आहेत. या सेलेब्रीटींमुळे खेळाला ग्लॅमरचा तडका मिळणार आहे. वास्तविक अनेक टीमच्या प्रशिक्षकांना फुटबॉलर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्स ब्राझीलमध्ये आलेल्या आवडलेले नाही. कारण त्यांना वाटते, की यामुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होईल आणि त्याचा त्यांच्या खेळावर विपरीत परिणाम होईल. काही संघाच्या प्रशिक्षकांनी तर सामन्यांच्या दरम्यान सेक्स करायचा नाही, असा अलिखित नियमच केला आहे. 
 
ब्राझीलमध्ये येत असलेल्या खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडला मोठी प्रसिद्धी मिळत आहे, तर काही शांतपणे सामन्यांचा आनंद घेणार असे दिसत आहे. ज्या खेळाडूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड सर्वाधित चर्चेत आहेत, त्यात स्पेनच्या गेरार्ड पीकची पत्नी शकीरा, व्हेन रुनीची पत्नी कॉलिन रुनी आणि अर्जेंटीनाचा सुपरस्टार लियोनेल मेसीची पत्नी अँटोनिला रोकूजा या प्रमुख आहेत. विशेष म्हणजे, फुटबॉलर्सच्या या पत्नी किंवा गर्लफ्रेंड यांची स्वतःची वेगळी ओळख आहे. कोणी सिंगर आहे, तर कोणी टीव्ही अँकर, तर कोणी अभिनेत्री आहे. 
 
जाणून घेऊ या, फुटबॉलर्सच्या प्रसिद्धचे वलय असलेल्या पत्नी - गर्लफ्रेंड काय-काय करतात...
 
शकीरा - स्पेनचा डिफेंडर गेरार्ड पीकची पत्नी 
फुटबॉलर्सच्या अर्धांगिणीमध्ये शकीरा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. 2010 च्या फुटबॉल विश्वचषकावेळी शकीराने जेव्हा वाका-वाका हे गाणे गायले होते तेव्हाच पीकशी तिची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये डेटिंग सुरु झाले आणि नंतर  ते विवाह बंधनात अडकले. 
 
इरिना शायक - क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड 
क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड ही रशियन मॉडेल आहे. 28 वर्षांच्या इरिनाने नुकतेच व्होग मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी रोनाल्डोसोबत पोज दिला होता. इरिनाने नुकता मॉडलिंगकडून अभिनयाकडे मोर्चा वळवला आहे.  पहिल्याच चित्रपटात न्यूड सीन दिल्याने ती चर्चेत आली होती. त्यामुळे फुटबॉलरच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडमध्ये इरिना सर्वाधिक चर्चित चेहरा आहे. 
 
अँटोनिला रोकूजा - अर्जेंटीनाचा सुपरस्टार लियोनेल मेसीची पत्नी 
कमालीचे सौंदर्य लाभलेली अँटोनिला मॉडलिंगमध्ये करिअर करीत आहे. 2008 पासून ती मेसीसोबत डेटिंग करीत होती. 2010 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना आता दोन वर्षांचा मुलगा आहे. 
 
कॉलिन रुनी - इंग्लिश क्रिकेटर व्हेन रुनीची पत्नी 
कॉलिन टीव्ही अँकर आणि स्तंभलेखिका आहे. कॉलिन 12 वर्षांची होती तेव्हा तिची भेट रुनीशी झाली होती. त्यानंतर चार वर्षांनी दोघांनी डेटिंग सुरु केले आणि 2008 मध्ये लग्न केले. या दोघांना आता दोन मुले आहेत. 
 
सारा कार्बोनिरो - स्पेनचा गोलकिपर आयकर कॅसिलासची पत्नी 
अमेरिकेचे मॅगझीन एफएचएमने साराला जगातील सर्वात सेक्सी स्पोर्टस् प्रेंझेटर हा किताब दिला आहे. साराच्या उपस्थितीने एक मोठा वाद 2010 च्या विश्वचषकादरम्यान निर्माण झाला होता. सारावर ठपका ठेवण्यात आला होता की, स्पेन - स्वित्झर्लंड सामन्यादरम्यान सारामुळे आयकरचे लक्ष विचलीत झाले आणि त्याचा परिणाम स्पेनला समाना गमावावा लागला होता. 
 
एन. कॅथरीन ब्रोमेल - जर्मनीचा मिडफिल्डर मारियोची गर्लफ्रेंड 
कॅथरीन मॉडेल आणि गायिका आहे. गेल्या एक - दोन वर्षांपासून ती मारियोसोबत डेटिंग करीत आहे. दोघांची पहिली भेट 2012 मध्ये झाली. कॅथरीन जर्मनीच्या टॉप मॉडेलपैकी एक मानली जाते. 
 
ब्रुना मार्कजीन - ब्राझीलचा खेळाडू नेमारची गर्लफ्रेंड 
ब्रुना अभिनयात करिअर करीत आहे. या वर्षाच्या सुरवातीला नेमार आणि ब्रुना यांच्यात बेबनाव असल्याचा बातम्या येत होत्या. ब्राझील मधील एका मॉडेलसोबत ब्रुनाचे संबंध असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने हे पाऊल उचलेल होते. मात्र, आता दोघेही एकत्र आले आहेत.