आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रुप फेरी पार करणे इंग्लंडचे पहिले लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉल वल्र्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा इंग्लंड संघाकडे किताबच्या दावेदार म्हणून पाहिले जात नाही. फुटबॉलप्रेमी या देशाच्या चाहत्यांना त्याच्या खेळाडूंकडून अपेक्षा कायम आहे. चाहते कमीत कमी ग्रुप लढतीत आपला संघ विजयी झालेला पाहू इच्छितात. त्यांचा संघ एवढा तरी आनंद त्यांना देऊ शकतो, असा विश्वास फुटबॉलप्रेमींना आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात केवळ दोन वेळा (1950 आणि 1958 मध्ये) इंग्लंडचा संघ ग्रुप लढतींच्या पुढे जाऊ शकले नाही. संघाला बाद फेरीत पोहोचवण्याचा दबाव वर्ल्डकप संघाचे पहिले इंग्लिश प्रशिक्षक रॉय हॉजसन यांच्यावर असेल. हॉजसन यांच्यावर संघाचा सुवर्ण इतिहास कायम ठेवण्याची जबाबदारी आहे.

फॉर्मेशन
हॉजसन यांच्याकडे संघासाठी विशेष उपाय आहेत. हॉजसन संघाला पारंपरिक 4-4-2 अशा प्रकारात संघाला मैदानावर उतरवतील. ते कधी कधी संघाला 4-2-3-1 असा आकार देतात.
ताकद
जर हॉजसन यांनी संघाला 4-2-3-1 अशा प्रकारे मैदानावर उतरवले तर, स्टीव्हन गेरार्ड संघाचा प्लेमेकरची भूमिका दिसू शकते. वायने रूनी संघाचा सुपरस्टार खेळाडू असून हा त्याचा तिसरा वर्ल्डकप आहे. ज्यावेळी रूनी आपल्या लयात असतो, तेव्हा विरोधी संघाला त्याला रोखणे अवघड ठरते. डॅनियल स्ट्रिजकडे सामना फिरवण्याची जबरदस्त क्षमता आहे.

कमजोरी
संघाची कमजोरी मिडफिडर ठरू शकते. संघाकडे मेसूत ओजिल (र्जमनी)आणि आंद्रेस इनेएस्ता (स्पेन) सारखे जबरदस्त मिडफिडर नाहीत. ग्लेन जॉन्सनच्या रूपात संघाकडे एकमेव राइट बॅक आहे. स्थानिक स्पध्रेत फिल जोन्स आणि क्रिस स्मालिंग यांचे प्रदर्शनदेखील खराब होते. यासह संघ काही नवीन आणि वेगळे करू शकली नाही. संघ आपला पारंपरिक खेळ खेळत आहे. यामुळे संघाची हानी होऊ शकते.
प्रमुख खेळाडू
फ्रेजर फोस्टर, लाइटन बेन्स, गेरी काहिल, फिल जोन्स, रोस बार्कले, स्टीव्हन गेरार्ड, फ्रेंक लॅम्पर्ड, रहीम स्टर्लिंग, वायने रूनी, डॅनी वेलबॅक.