आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक चॅम्पियन तर पहिल्याच फेरीत बाहेर पडेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इटली, इंग्लंड आणि उरुग्वे हे तिन्ही माजी चॅम्पियन हे यंदाच्या वल्र्डकपमध्ये एकाच डी गटातून खेळणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे यातील दोनच संघ पुढच्या फेरीत जाऊ शकतील. त्यामुळे कमीत कमी एक टीम ग्रुपच्या सामन्यातील पराभवानंतर मायदेशी परतेल. जर ग्रुपमधील चौथी टीम कोस्टारिकाने चमत्कार घडवला तर दोन चॅम्पियन संघांना गाशा गुंडाळावा लागेल. मात्र, याची शक्यता फार कमी आहे.
ग्रुप डीमध्ये माजी चॅम्पियन इंग्लंड, इटली आणि उरुग्वे
आंद्रे पिरलो इटली डिएगो फोरलान उरुग्वे.
ग्रुप बीमध्ये स्पेन, हॉलंड, चिली आणि ऑस्ट्रेलिया संघ आहे. त्यामुळे गत वर्ल्डकपचे फायनलिस्ट स्पेन आणि हॉलंडची वाट खडतर आहे. चिली चांगली कामगिरी करून या दोन्ही संघांना अडचणीत आणू शकते. या तिन्ही टीममुळे ऑस्ट्रेलियाचे ग्रुपमधून पुढची फेरी गाठणे फार कठीण आहे.