गुरुवारी रात्री यजमान ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील उद्घाटनीय सामन्यासह पूर्ण जग 20 व्या विश्वचषक फुटबॉलच्या रोमांचामध्ये बुडून गेला. सर्व 32 संघांना या जागतिक स्पर्धेत खेळण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यामुळेच कोणत्याही संघाला कमी लेखणे, हे चुकीचे ठरेल. मात्र, गत स्पर्धेतील कामगिरी पाहता ब्राझीलकडे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये किताबाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिनादेखील कमी नसल्याचे चित्र आहे. नेमारसारख्या स्ट्रायकरमुळे ब्राझील टीमचे पारडे अधिक जड झालेले आहे. याशिवाय यजमान टीमला घरच्या मैदानावरील उपस्थित चाहत्यांचाही फायदा होणार आहे. याच गर्तेमागील चॅम्पियन स्पेन टीमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
2010 मध्ये विश्वविजेता झाल्यापासून स्पेन सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. 2008 मध्ये यूएफ युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर स्पेन संघाने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप जिंकला होता. यासह स्पेन संघाने 2012 युरोपियन चॅम्पियनशिपच्या विजेतेपदावरचे वर्चस्व कायम ठेवले. यामुळे स्पेनलाही किताबाचा दावेदार मानल्या जात आहे. अर्जेंटिना आणि पोर्तुगालचा विश्वविजेता होण्याचा दावाही अधिक प्रबळ आहे. लियोनेल मेसी (अर्जेंटिना) आणि
क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) हे दोघे मागील सहा वर्षांपासून ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार’ आपापसात वाटून घेत आहेत. जर्मनी टीमदेखील किताबाच्या दावेदारापैकी आहे. उत्साही युवा आणि अनुभवी खेळाडूंमुळे जर्मनी संघ अधिक मजबूत मानला जात आहे. लुकास पदोस्कीसारख्या युवा खेळाडूकडे वयाच्या 27 व्या वर्षापर्यंत 100 पेक्षा अधिक आंतररराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. स्पेन संघ जबरदस्त फॉर्मात असतानाच जर्मनीचा सध्याचा संघ दुर्दैवाने स्पर्धेत खेळत आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, माजी आठ विजेत्यांची धम्माल..