आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा वर्ल्डकप: फ्रान्सचा स्टार फ्रॅक रिबेरी करणार ‘आखरी सलाम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- येत्या 12 जूनपासून ब्राझीलमध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या वल्र्डकपमध्ये फुटबॉल विश्वातील अनेक दिग्गज नशीब आजमावणार आहेत. मात्र, हा वर्ल्डकपमध्ये फ्रान्सचा स्टार खेळाडू फ्रॅक रिबेरी ‘आखरी सलाम’ करणार आहे. ‘आपल्या करिअरमधील हा शेवटचा वर्ल्डकप आहे,’ अशी प्रतिक्रिया देऊन रिबेरीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.

मात्र, त्याच्या या निर्णयावर अनेक दिग्गजांनी तीव्र नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडले आहे. ‘रिबेरीने निवृत्तीचा निर्णय अधिकच घाईत घेतला आहे,’ अशा शब्दात फ्रान्स फुटबॉलचे प्रमुख नोएल ले ग्रेट यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आगामी वर्ल्डकप चार वर्षांनी होणार आहे. या वर्ल्डकपमध्येही खेळण्याची क्षमता रिबेरीमध्ये आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गत 2006 च्या वर्ल्डकपमध्ये रिबेरीने उल्लेखनीय कामगिरी करताना फ्रान्स टीमचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. मात्र, या वेळी फ्रान्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या वेळी झालेल्या अंतिम सामन्यात इटलीने पेनॉल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव केला होता.

मात्र, 2010 चा वल्र्डकप रिबेरीसाठी फारसा चांगला राहिला नाही. सुमार कामगिरीमुळे फ्रान्सला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यातील पराभवामुळे फ्रान्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याने 81 सामन्यांत फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याच्या नावे 16 गोल केल्याची नोंद आहे.

500 कोटींचे सुरक्षा कवच
पुढच्या महिन्यात होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला तब्बल 500 कोटींचे ‘सुरक्षा कवच’ आहे. ब्राझील शासनाने या वर्ल्डकपच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तब्बल 800 मिलियन डॉलर (500 कोटी) खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता सामन्यांचे आयोजित करण्यात आलेल्या 12 शहरांमध्ये एक लाख 70 हजारांपेक्षा अधिक पोलिस, सैन्यदल आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी सक्रिय राहणार आहेत. यातील रिओ डी जानेरिओमध्ये सुरक्षेसाठी 20 हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील.

>08 ते 29 जूनदरम्यान आयोजन
>16 संघांनी घेतला होता सहभाग
>16 गोलची रिबेरीच्या नावे नोंद
>1958 मध्ये यजमान स्वीडनमध्ये वर्ल्डकपचे आयोजन
>81 सामन्यांत रिबेरीकडून फ्रान्सचे प्रतिनिधित्व